gujiya : गुझियाला मराठीमध्ये काय म्हणतात? कधी केला जातो हा स्वादिष्ट पदार्थ?

117
gujiya : गुझियाला मराठीमध्ये काय म्हणतात? कधी केला जातो हा स्वादिष्ट पदार्थ?

बर्‍याचदा होतं असं की काही पदार्थ सारखेच असतात, मात्र विविध प्रांतामध्ये त्यास वेगवेगळी नावे दिली जातात आणि त्या विशिष्ट प्रांतानुसार चवीचा एक खास स्पर्श देखील दिला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पदार्थाबद्दल सांगणार आहोत. या पदार्थाचं नाव आहे गुझिया… (gujiya)

गुझिया म्हणजे काय?

गुझिया हा पदार्थ पीठ आणि खव्यापासून बनवला जातो. विविध प्रांतात यास वेगवेगळे नाव पडले आहे. छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पुरुकिया, आंध्र प्रदेशात काज्जिकयालू, गुजरातमध्ये घुघरा, गोव्यात नेव्री आणि आपल्या महाराष्ट्रात करंजी म्हणतात. हं! आलं की नाही तुमच्या लक्षात? आज आपण करंजीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (gujiya)

(हेही वाचा – lingampally railway station : लिंगमपल्ली रेल्वे स्टेशन वरून कोणकोणत्या ट्रेन्स सुटतात?)

गुझिया कसा असतो?

तर वाचकहो, उत्तर भारतात होळी आणि दक्षिण भारतात दिवाळीनिमित्त घरी गुढ्या बनवण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रातही आपण गुढी उभारतो, पण गुढी पाडव्याला. तर मुख्यतः दोन प्रकारचे गुझिया बनवले जातात, एक म्हणजे माव्याने भरलेला गुझिया आणि दुसरा प्रकार म्हणजे रवा भरलेला गुझिया. काहीवेळा हिरवे हरभरे, सुका मेवा किंवा अंजीर किंवा खजूर यांसारखे पदार्थ घालून देखील गुझिया तयार केला जातो. (gujiya)

गुझिया कसा बनवला जातो? 

गुझिया विशेषतः होळीमध्ये बनवला जातो. होळीच्या सणात गोडधोड करण्याची पद्धत असते. महाराष्ट्रात होळीला पुरणपोळी केली जाते. मात्र इतर भागात गुझिया या पदार्थाचा आस्वाद घेतला जातो. गुझियाचा बाहेरील भाग मैद्यापासून बनवला जातो. हा मैदा तुपात मळून घेतला जातो. (gujiya)

आतमध्ये गोड मावा, सुका मेवा, किसलेले खोबरे आणि साखर एकत्र करुन घातला जातो. खोबरे विशेषतः महाराष्ट्रात घालण्याची पद्धत आहे. इतर ठिकाणी खोबरे घालण्याची पद्धत नाही. मग हा गुझिया तेलात तळला जातो. (gujiya)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.