गोड पदार्थ प्रत्येकालाच आवडतात, जेवणानंतर अनेकजण स्विट डिशचा आस्वाद घेतात. अलिकडे आपण घरबसल्या अगदी सहज गोड पदार्थ ऑर्डर करू शकतो. परंतु अनेकदा फूड डिलिव्हरी अॅपवर ऑर्डर करताना वाजवी किमतीपेक्षा कितीतरी जास्त पैसे आकारले जातात. असाच अनुभव एका युजरला आला असून सध्या त्याने केलेले ट्वीट सर्वत्र व्हायरल होत आहे. एका व्यक्तीला झोमॅटो अॅपवरून गुलाबजाम मागवायचे होते तेव्हा छोट्या गुलाबजामची किंमत ४०० रुपये इतकी दाखवण्यात येत होती. या रेटकार्डचा फोटो या युजरने ट्विट केला आहे.
( हेही वाचा : …तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही! – धीरेंद्र शास्त्री)
वाढीव किंमत दाखवून ८० टक्के सूट
भूपेंद्र नावाच्या युजरने यासंदर्भात ट्विटरवर स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये झोमॅटोवर गुलामजामूनसाठी ४०० रुपये तर गाजराच्या हलव्यासाठी ३ हजार रुपये प्रति किलो मूळ दर दाखवण्यात येत असून यावर युजरला ८० टक्के सूट मिळणार होती. अशा वाढीव मूळ किंमती दाखवून त्यावर ८० टक्के सूट देत आहेत मी खरंच २०२३ मध्ये राहतोय का? असे लिहित झोमॅटोला टॅग केले आहे. या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ग्राहकांना फसवण्यासाठी अशा मूळ किंमती बदलून सवलती दिल्या जातात असा आरोप अनेकांनी केला आहे.
झोमॅटोचे स्पष्टीकरण
भूपेंद्र यासंदर्भात आम्ही चौकशी करू कृपया आमच्या DM मध्ये याचे तपशील पाठवा, आम्ही किमती निश्चित करण्यासाठी रेस्टॉरंटशी संपर्क साधू असे स्पष्टीकरण झोमॅटोच्यावतीने भूपेंद्र यांना देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community400 rupees for 2 Gulab Jamun, 3000 rupees kg Gajar halwa, after that 80% off. Can’t believe that it is that much cheap. Am I really living in 2023?#Zomato is too generous for people living in 2023#zomatobanarhapagal, #createdinflation, #jiyetojiyekaise @deepigoyal pic.twitter.com/AdvFVbhBvu
— Bhupendra (@sbnnarka) January 22, 2023