‘गल्ली बॉय’ फेम एमसी तोडफोड रॅपरचे निधन

71

गल्ली बॉय फेम एमसी तोडफोड या नावाने प्रचलित झालेल्या धर्मेश परमारचे निधन झाले आहे. धर्मेश अवघ्या २४ वर्षांचा होता. गल्ली बॉय हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर सिंग आणि आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका होत्या यातील ५० रॅपर्सपैकी धर्मेश हा एक रॅपर होता. रणवीर सिंग, आलिया भट, सिद्धार्थ चतुर्वेदी, झोया अख्तरसह गल्ली बॉय चित्रपटाच्या संपूर्ण टीमने धर्मेशला श्रद्धांजली अर्पण केली.

हा होता धर्मेशचा शेवटचा परफॉर्मन्स

स्वदेसी मेळा या कार्यक्रमात एमसी तोडफोड अर्थात धर्मेशने शेवटचा परफॉर्मन्स दिला. स्वदेसी मूव्हमेंटने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
यात तू कायम स्मरणार राहशील असे स्वदेसी मूव्हमेंटने लिहिले आहे.

( हेही वाचा : कोकणात जायला गाड्या फुल्ल? तरी मिळणार कन्फर्म तिकीट )

संगीतावर जीवापाड प्रेम

धर्मेश हा गेल्या काही दिवसांपासून हृदय रोगाच्या त्रासाने त्रस्त होता. त्याला चार महिन्यात तीन वेळा हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक माहिती त्याच्या आईने दिली. तो त्याच्या जीवापेक्षा जास्त संगीतावर प्रेम करायचा त्याने या आजाराकडे दुर्लक्ष करत काम सुरू ठेवले असेही त्याच्या आईने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swadesi (@swadesimovement)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.