gym motivation quotes वाचा आणि रहा तंदुरुस्त! खोटं वाटतंय? मग वाचा हा लेख

394
gym motivation quotes वाचा आणि रहा तंदुरुस्त! खोटं वाटतंय? मग वाचा हा लेख

सुदृढ राहण्यासाठी लागणारे कठोर परिश्रम प्रत्येक व्यक्ती करतातच असं नाही. याला बरेच जण अपवाद असू शकतात. पण काही लोकांना खरोखरच व्यायाम करण्यासाठी आणि स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. (gym motivation quotes)

बऱ्याच लोकांना जिममध्ये जाण्यासाठी, आपला वर्कआउट सेट पूर्ण करण्यासाठी आणि सामान्यतः आपल्या फिटनेस ध्येयांच्या ट्रॅकवर राहण्यासाठी अतिरिक्त प्रोत्साहन देण्याची असते. आपल्या आसपास असंख्य मन विचलित करणाऱ्या गोष्टी असतानाही घरी कसरत सुरू करण्यासाठी किंवा जिममध्ये जाण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करणं हे खूप आव्हानात्मक असू शकतं. (gym motivation quotes)

(हेही वाचा – Assembly Budget Session 2025 : शक्तीहीन विरोधकांचे सक्तीचे सहकार्य)

त्यासाठी एक पर्याय म्हणजे वैयक्तिक फिटनेस कोच नियुक्त करणं होय. तुमचा फिटनेस कोच तुम्हाला सतत व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देत राहील. पण पुष्कळदा वयक्तिक कोच आकारत असलेल्या उच्च किंमती पाहता, बऱ्याच लोकांना ते परवडण्यासारखं नसतं. (gym motivation quotes)

म्हणूनच अशा लोकांसाठी आम्ही आजच्या लेखामध्ये काही फिटनेस कोट्स तुम्हाला सांगणार आहोत. हे कोट्स तुमच्या फिटनेस ध्येयांवर टिकून राहण्यासाठी, तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन देतील. हे फिटनेस कोट्स प्रसिद्ध खेळाडू, सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या अनुभवावरून सांगितलेले आहेत. हे कोट्स तुमचं फिटनेसचं ध्येय गाठण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करतील. (gym motivation quotes)

(हेही वाचा – EPFO KYC : ईपीएफओसाठीची केवायसी ऑनलाईन कशी करायची?)

व्यायामासाठी प्रोत्साहित करणारे कोट्स : 
  • “फिटनेस ट्रेनिंगचा प्रत्येक क्षण नावडता असला तरीही, ‘थांबू नका. आता थोडे कष्ट करा आणि उर्वरित आयुष्य एक विजेता म्हणून जगा.” – मुहम्मद अली
  • “आपण ज्या गोष्टी वारंवार करतो, तसंच आपलं व्यक्तिमत्त्व घडतं. उत्कृष्टता म्हणजे कृती नाही तर एक सवय आहे.” – अ‍ॅरिस्टोटेल
  • “आपलं शरीर आणि मन जे मानतं ते साध्य करतं.” – नेपोलियन हिल
  • “कष्टाचे दिवस सर्वोत्तम असतात. कारण तेव्हाच विजेते घडतात, म्हणून तुम्ही कष्टांवर मात करून पुढे गेलात तर तुम्ही आयुष्यात पुढे इच्छित गोष्टी साध्य करू शकता.” – डाना व्होल्मर
  • “जर तुम्हाला वेळ मिळाला नाही, जर तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार नाही.” – अर्नोल्ड श्वार्झनेगर
  • “जर तुम्हाला उद्याचा दिवस कालपेक्षा चांगला हवा असेल, तर कालपेक्षा जास्त कष्ट आज करा.” – व्हिन्सेंट विल्यम्स सीनियर
  • “खरा व्यायाम तेव्हा सुरू होतो, जेव्हा तुम्हाला थांबावसं वाटतं.” – रॉनी कोलमन
  • “तुमच्या शरीराची काळजी घ्या. तुमचं अस्तित्व टिकण्याण्यासाठी हेच एकमेव ठिकाण आहे.” – जिम रोहन
  • “मी माझ्या आयुष्यात वारंवार अपयशी ठरलो आहे. आणि म्हणूनच मी यशस्वी झालो.” – मायकल जॉर्डन
  • “एकदा तुम्ही नियमितपणे व्यायाम केला की, सर्वात कठीण गोष्ट म्हणजे तो थांबवणं.” – एरिन ग्रे
  • “ आयुष्यात पुढे जाण्याचं रहस्य म्हणजे, नव्याने सुरुवात करणं.” – मार्क ट्वेन
  • “तुम्हाला ते दुखणं सहन करावंच लागेल. तुम्ही जितका जास्त व्यायाम कराल तितके तुम्ही सुंदर दिसाल. तुमचं स्वरूप हे तुम्ही किती जड वजन उचलता, त्यावर नाही तर, तुम्ही किती कठोर परिश्रम करता यावर अवलंबून आहे.” – जो मॅंगियानेलो
  • “बहुतेक लोक अपयशी ठरतात. इच्छा नसल्यामुळे नाही तर वचनबद्धतेच्या अभावामुळे.” – विन्स लोम्बार्डी
  • “जर तुमच्या आणि तुमच्या यशाच्या मध्ये काही अडथळे असतील तर ती दूर करा.” – ड्वेन “द रॉक” जॉन्सन
  • “ माणसाची प्रगती कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्यावरच होते.” – मायकेल जॉन बॉबॅक
  • “फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. जरी तुम्ही तसं केलं नाही तरी, फक्त असे वागा की, तुमचा स्वतःवर खूप विश्वास आहे. असं करता करता कधीतरी तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढलेला पाहाल.” – व्हीनस विल्यम्स

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.