आपले केस जाड आणि दाट असावेत, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. (Hair Care) अलीकडे मुलेही केसांच्या बाबतीत सजग झालेली आहेत. त्यातच आधुनिक जीवनशैलीच्या दुष्परिणामांमुळे प्रत्येकाला केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी केळ्याचे हेअर पॅक तुम्हाला केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतील. केळीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केस आणि त्वचेसाठीही तुम्ही केळी वापरू शकता.
(हेही वाचा – Mega Block : गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द)
१. दोन केळी मॅश करून त्यात अंडी मिक्स करा. अंडी आणि केळ्याची पेस्ट केसांना लावून काही वेळ डोक्याला मसाज करा. ही पेस्ट अर्धा तास तशीच राहू द्या आणि नंतर धुवा. या पेस्टचा वापर केल्याने केसांचे सौंदर्य वाढेल. (Hair Care)
२. दही आणि केळी मिक्स करून डोक्याला लावा. यानंतर शॉवर कॅप घाला. 40 मिनिटांनी डोके कोमट पाण्याने धुवावे. हा पॅक तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवेल.
३. आता एक केळी मॅश करून त्यात डोक्याला लावायचे कोणतेही तेल मिक्स करून पेस्ट बनवा. केसांना लावा. हे हेअर पॅक तुमचे केस चमकदार आणि सुंदर बनवेल. (Hair Care)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community