-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला जगभरातील सगळ्याच देशांना आपल्या आयात शुल्क इंजेक्शनचा दुसरा कडू डोस दिला. तिथपासून जगभरातील शेअर बाजार पुन्हा एकदा विक्रीच्या तडाख्यातून जात आहेत. जिथे जिथे आयात शुल्क वाढणार आहे, ते शेअर जास्त कोसळले आहेत. पण, इतरांनाही तडाखा बसतोच आहे. अवजड उद्योगही कचाट्यातून सुटलेले नाहीत. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला या आठवड्यात ६२,५०० कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. तरीही हा शेअर २ टक्क्यांनी खाली आहे. (HAL Share Price)
शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात शेअरमध्ये एकूण २ टक्क्यांची पडझड झाली आणि हा शेअर ४,२३८ वर बंद झाला. पण, मागच्या अख्ख्या वर्षाचा आढावा घेतला तर खरंच या शेअरने तब्बल २० टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. कारण, केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रातील आपली गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतल्यापासून मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकालात या क्षेत्रातील कंपन्यांना भरघोस ऑर्डर दिल्या आहेत. अशावेळी सध्या विक्रीच्या माऱ्यात फसला असला तरी संशोधन संस्था या शेअरविषयी काय म्हणतात ते समजून घेऊया, (HAL Share Price)
(हेही वाचा – Crime News : बनावट स्वाक्षरी करून रेल्वे तिकिटे कन्फर्म करून विक्री करणाऱ्या चहा विक्रेत्याला अटक)
एकतर आर्थिक वर्ष २०२५ चा शेवट या कंपनीसाठी चांगला झाला आहे. सरकारी ऑर्डरच्या जोरावर कंपनीने तिमाही ताळेबंदात चांगल्या कामगिरीची नोंद केली आहे. त्यातच १ एप्रिलला सरकारने दिलेली ६२,७०० कोटींची नवीन ऑर्डर ही कंपनीसाठी आणखी कमाईची संधी घेऊन आली आहे. त्यामुळे युबीएस या परदेशी संशोधन संस्थेनं एचएएलचं लक्ष्य ३३ टक्क्यांनी वाढवलं आहे. हा शेअर आताच्या किमतीपेक्षा ३३ टक्के वर जाईल असा त्यांचा होरा आहे. कंपनीने एका महिन्यापूर्वीच गुंतवणूकदारांना शेअरमागे २५ रुपयांचा लाभांश जारी केला आहे. (HAL Share Price)
मॉर्गन स्टॅनली या आणखी एका जागतिक संशोधन संस्थेनं या शेअरवर ओव्हरेटेड हा शिक्का कायम ठेवला आहे. शेअरचं लक्ष्य ४,९५८ रुपये इतकं निर्धारित केलं आहे. तर जेफरीजने शेअरचं लक्ष्य ५,७२५ रुपये इतकं निर्धारित केलं आहे. येत्या दिवसांमध्ये या शेअरचं विभाजनही होऊ शकतं. तसं झालं तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे. (HAL Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर ही गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट वाचकांना शेअरमध्ये खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community