तुम्हाला शांत झोप लागतेय ना…? नसेल तर ही बातमी वाचा

148

अनेकांना निद्रानाश ही समस्या भेडसावताना दिसते. आयुष्यातील महत्त्वाच्या तणावकारक घटना जशा की, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट, अचानक नोकरी जाणं, यासह शारीरिक आजारपण आणि वेदना, भावनात्मक ताणतणाव, काही औषधांचे साइड इफेक्ट्स, नैराश्य, दबलेली असुरक्षितता, भीती ही कारणे आहेत. यासह नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी सततच्या नाइट शिफ्ट्समुळे झोपेचे बिघडलेले रुटीन, व्यसने, ताण तणावाचा आजार, या गोष्टींमुळे निद्रानाशाला सामोरे जावे लागते. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे किंवा रात्रभर जागून काम करणे आणि दिवसा झोपणे ही बाब भारतीयांच्या नव्या दिनक्रमाचा भाग होत चालली आहे, त्याचाच परिणाम म्हणून खंडित निद्रेचा विकार, मधुमेह असे विकास जडल्याचे समोर येत आहे.

खंडित निद्रेच्या विकाराची ही आहेत कारणं

रेसमेड या खासगी संस्थेने देशाच्या कानाकोपऱ्यातील काही हजार नागरिकांच्या मुलाखतींमधून त्यांच्या झोपेच्या बदललेल्या आणि बिघडलेल्या वेळापत्रकाचा अभ्यास या सर्वेक्षणातून केला आहे. औषध आणि वैद्यकीय तंत्रज्ञानावर संशोधन करणारी रेसमेड ही संस्था आहे. तब्बल ८१ टक्के भारतीयांनी झोपेची गुणवत्ता जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करत असल्याचे यावेळी नमूद केले, मात्र रोजच्या जगण्यातील वाढते ताणतणाव, कामाच्या ठिकाणी असलेली स्पर्धा, मोबाइल आणि इतर उपकरणांचा वापर यांमुळे झोपेवर परिणाम झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वेक्षणातून काय आले समोर…

सर्वेक्षणातून असे समोर आले की, बहुतेक नागरिकांनी झोप येण्यास सरासरी ९० मिनिटांचा वेळ लागतो. तब्बल ५९ टक्के नागरिकांना घोरण्याचा त्रास आहे. ७२ टक्के नागरिकांची झोप कमी आहे. त्यामुळे त्यांना विविध मानसिक विकारांचा सामनाही करावा लागतो. यासह रेसमेडतर्फे असेही स्प्ष्ट करण्यात आले की, शरीराला पुरेशी झोप, पर्यायाने विश्रांती न मिळाल्याने शरीर जास्त वेळ कार्यरत राहते. त्याचा परिणाम रक्तातील साखरेच्या प्रमाणावर होतो, त्यामुळे झोपेच्या तक्रारी असलेल्या नागरिकांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता अधिक असल्याचे समोर आले आहे. खंडित निद्रेचा विकार म्हणजे स्लीप ऑप्निआ यांचा त्रास ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील नागरिकांमध्ये अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

जाणून घ्या खंडित निद्रा विकाराची कारणे, लक्षणे 

* धूम्रपान, मद्यपान

* महिलांमध्ये हार्मोन्समधील बदल

* मानसिक आरोग्याच्या तक्रारी

* ताणतणाव, स्पर्धा, वर्तनाच्या समस्या

* मोबाइल, गॅजेट्सचा अतिरेकी वापर

 चांगल्या झोपेसाठी करा हे उपाय

* चालणे, योगासने किंवा कोणताही व्यायाम नियमित करा

* झोपण्यापूर्वी किमान तासभर मोबाइल आणि गॅजेट्सचा वापर कमी करा

* दैनंदिन जगण्यात चौरस आहाराचा समावेश करा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.