-
ऋजुता लुकतुके
विजेची बचत आणि पर्यावरण पूरक ऊर्जेचा वापर हा सध्याचा मंत्र आहे. त्यासाठी लागणारं संशोधन आणि निर्मिती करणारी देशातील एक कंपनी आहे हॅलोनिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड. ही कंपनी सीएफएल बल्ब, एलईडी दिवे आणि हॅलोजन दिवे तयार करणारी ही कंपनी आहे. त्याचबरोबर विजेची बचत होईल असं संशोधन करण्यातही कंपनी अग्रेसर आहे. देशातील २० राज्यांमध्ये कंपनीची उत्पादनं पोहोचतात. रहिवासी तसंच व्यावसायिक वापरासाठी एलईडी आणि सीएफएल बल्ब बनवण्याचं काम ही कंपनी करते. (Halonix)
१९९१ साली राकेश झुत्शी यांनी फिनिक्स लॅम्प्स लिमिटेड म्हणून या कंपनीची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी जपानी कंपनीबरोबर संयुक्त भागिदारीचा करार केला होता. सीएफएल बल्ब आणि हॅलोजन दिवे बनणारी ही कंपनी दुचाकी तसंच चारचाकी गाडयांसाठीही हॅलोजन दिवे बनवते. नॉयडा इथं मुख्यालय असलेल्या या कंपनीचे कारखाने हरिद्वार आणि डेहराडून इथंही आहेत. एका वर्षांत १५०.९ दशलक्ष दिवे बनवण्याची या कंपनीची क्षमता आहे. (Halonix)
(हेही वाचा – NCC Share Price : एनसीसी कंपनीला मिळाल्या दोन नवीन ऑर्डर; शेअर ६ टक्क्यांनी वर)
कारखाने असलेल्या ठिकाणीच कंपनीचं संशोधन केंद्रही आहे. बाँबे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही महत्त्वाच्या शेअर बाजारात ही कंपनी नोंदणीकृत आहे. २००७ मध्ये या कंपनीत ॲक्टिस कॅपिटल या कंपनीने मूळ मालक झुत्शी कुटुंबीयांकडून कंपनीचे बहुसंख्य शेअर विकत घेतले. तेव्हापासून ॲक्सिस कॅपिटल्स ही या कंपनीतील सर्वात मोठी भागिदार कंपनी होती. पण, २०१६ मध्ये ॲक्सिक यांनी आपल्याकडे असलेले शेअर टीपीजी न्यूक्वेस्ट कॅपिटल्स यांना विकले. आता कंपनीवर टीपीजी कॅपिटल्सचं वर्चस्व आहे. (Halonix)
भारतीय बल्ब बाजारपेठेचा चांगला अभ्यास असलेले आणि मूळ कंपनी फिनिक्स बल्बसचे संस्थापक राकेश झुत्सी हे अजूनही कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते इथं काम पाहतात. त्यांच्या बरोबरीने कार्तिक रैना, अमित गुप्ता आणि विजय थॉमस जेकब या महत्त्वाच्या व्यक्ती संचालक मंडळात आहेत. मार्च २०२५ पर्यंत कंपनीचं शेअर बाजारातील भाग भांडवल १९५ कोटी रुपयांचं आहे. बल्ब व्यवसायातील कंपनीची हिस्सेदारी ही ९ टक्के आहे. (Halonix)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community