happy birthday wishes in marathi : तुमच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आता आपल्या माय मराठीत

22
happy birthday wishes in marathi : तुमच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आता आपल्या माय मराठीत

आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे. तो एका सागराप्रमाणे अथांग असतो. आयुष्यातला प्रत्येक दिवस हा नवा अनुभव घेऊन येत असतो. तसंच वाढदिवस हाही आयुष्यातला एक विशेष दिवस असतो. प्रत्येक वाढदिवस आपल्या आयुष्यात आनंद आणि जगण्याची नवीन उमेद घेऊन येतो.

तसंच वाढदिवस हा आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा खास दिवस असतो. तसंच हा दिवस आयुष्यातलं यश आणि प्रेम साजरं करण्याची एक नामी संधी असते.

आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये आपल्या मित्रांना, कुटुंबियांना आणि प्रियजनांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही कोणत्या शुभेच्छा देऊ शकता ते सांगणार आहोत. या शुभेच्छा नक्कीच तुमच्या प्रियजनांच्या वाढदिवसाला आनंदाचं उधाण घेऊन येतील. चला तर मग पाहुयात.. (happy birthday wishes in marathi)

(हेही वाचा – Pune-Karnataka Bus सेवा बंदच; सीमेवरील नागरिकांना फटका)

  • आज तुमच्या वाढदिवशी तुमचं जीवन फुलांनी सजू दे
    आणि तुमच्या प्रत्येक क्षणात हसू आणि आनंद विखुरलेला असू दे.
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
  • जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो..
    तुमचा हा खास दिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो..
    या खास दिवशी तुम्हाला नवी आशा, प्रेम आणि आशीर्वादांची प्राप्ती होवो.. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
  • तुम्ही सर्वात सुंदर आणि आनंदी असावे,
    ही माझी मनःपूर्वक इच्छा..
    तुमचं जीवन सदैव आनंदाने भरलेलं असो हीच सदिच्छा..
    तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!
  • आजच्या दिवशी तुम्हाला जशा अनेक शुभेच्छा मिळतील,
    तशाच तुमच्या आयुष्यात इंद्रधनुचे सप्तरंग भरले जावेत.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! (happy birthday wishes in marathi)

(हेही वाचा – Bullet Train प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला वेग; पाचव्या प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम पूर्ण)

  • तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस विशेष असो,
    तुमच्या चेहऱ्यावर कायम हसू असो,
    आणि तुमच्या जीवनात सर्व सुख-शांती असो…
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यात
    सुख आणि समृद्धी घेऊन येवो…
    आकाशातला प्रत्येक तारा
    तुमच्या जीवनात प्रकाश भरो..
    तुम्ही सदैव आनंदात आणि समृद्धीत राहा…
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • तुम्ही जितके सुंदर आहात,
    तितकेच तुमचे आयुष्यही असावे अशी माझी इच्छा…
    तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।
  • तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असो…
    तुमच्या वाढदिवशी ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा आणि सुखाचा वर्षाव करो
    आणि तुमचा येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खास असो..
    तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। (happy birthday wishes in marathi)

(हेही वाचा – gudi padwa wishes in marathi : गुढी पाडव्याला करा आपल्या आवडत्या व्यक्तीवर शुभेच्छांचा वर्षाव)

  • तुमच्या जीवनात प्रत्येक दिवस
    हसण्याची आणि प्रेमाची नवी गाथा सुरू होवो..
    तुम्हाला अमाप प्रेम आणि सुख मिळो..
    तुमच्या आयुष्यात सर्व ठिकाणी सुख आणि समृद्धीचा उजाळा असो..
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • प्रेम आणि आनंदाच्या धुंद लहरांनी तुमच्या जीवनात प्रवेश करावा
    आणि तुमचा प्रत्येक दिवस विशेष व्हावा..
    आनंदाची लाट तुमच्या जीवनात यावी,
    सगळी दुःख दूर जावीत..
    पूर्ण होवो तुमच्या सगळ्या सदिच्छा,
    वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा! (happy birthday wishes in marathi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.