दसऱ्याला सोनं खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

115

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ दिवस समजला जातो. यामुळे दसऱ्याला संपूर्ण देशभरात विशेष महत्त्व आहे. यामुळे दसऱ्यानिमित्त अनेक लोक सोनं खरेदीला महत्त्व देतात परंतु दसऱ्या दिवशी सोनं खरेदी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा…

( हेही वाचा : वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात! ५ जणांचा मृत्यू; रस्ता वाहतुकीसाठी बंद)

सोन्याची शुद्धता तपासून घ्या

सोने खरेदी करताना सोन्याची शुद्धता तपासणे आवश्यक असते. सोन्याची शुद्धता ही कॅरेटवरून समजते. सोनं खरेदी करताना हॉलमार्कचा शिक्का आहे का हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. हॉलमार्क असलेले सोने म्हणजेच सोन्याची शुद्धतेची खात्री. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोने खरेदी करा. हा सोन्याची शुद्धता तपासण्याचा महत्त्वपूर्ण निकष मानला जातो.

किंमत पडताळून पहा

दागिन्यांची किंमत ही सोन्याच्या शुद्धतेवर अवलंबून असते. दागिन्यांमध्ये मिश्रधातू वापरले असतील तर सोन्याची किंमत बदलते. तसेच दागिना घडवण्याची मजुरीही सुद्धा या पकडली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या दुकानात जाऊन तुम्ही सोन्याची किंमत तपासली पाहिजे. विश्वसनीय सराफाकडूनच दागिने घेणे जास्त सुरक्षित असते.

व्हाइट किंवा रोज गोल्ड अधिक मौल्यवान

अनेक सराफ शुद्ध सोन्यामध्ये धातू मिसळून दागिने घडवतात यामुळे सोन्याचा रंग बदलतो. भारतात आजही पिवळसर सोन्याला मागणी आहे. पण व्हाइट किंवा रोज गोल्ड अधिक मौल्यवान असते असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते. त्यामुळे सोन्यात कोणता धातू मिसळला आहे याची खात्री करा.

सोन्याचे वजन करा

सोन्याच्या आधुनिक डिझाईनर दागिन्यांमध्ये विविध खडे वापरले जातात. या खड्यांचे वजन सुद्धा एकूण किंमत ठरवताना केले जाते. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करताना शुद्ध सोन्याचं वजन आणि त्यात वापरलेल्या खड्याचे वजन याची खात्री करावी. खड्यांचे वजन धरून दागिना महाग विकला जातोय का याची खात्री करा.

हॉलमार्कशिवाय दागिने घेऊ नका

सोनं विकत घेऊन अनेकजण गुंतवणूक करतात त्यामुळे सोनं खरेदी करणं हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि जोखमीचा निर्णय असतो. अशावेळी हॉलमार्क सोन्याच्या शुद्धतेची खात्री देत असल्याने केवळ हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.