Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi : कृष्ण जन्माष्टमीचे १२ सर्वोत्तम संदेश; तुमच्या मित्रांना नक्कीच पाठवा

81
Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi : कृष्ण जन्माष्टमीचे १२ सर्वोत्तम संदेश; तुमच्या मित्रांना नक्कीच पाठवा

हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाचा जन्म द्वापारयुगात झाला. श्रीकृष्णाला कन्हैया, माधव, श्याम, गोपाल, केशव, द्वारकेश, वासुदेव आणि द्वारकाधीश या नावांनीही ओळखले जाते. श्रीमद भागवत आणि महाभारतात त्याच्या जीवनाचे तपशीलवार वर्णन आहे. (Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi)

आपल्याकडे एखादं मुल जन्माला आलं तर आपण त्याला बाळकृष्ण म्हणतो. इतका कृष्ण आपल्याला आवडतो. त्याने सांगितलेली भगवद्गीता आजही जगाला सत्याचा संदेश देत आहे. कृष्ण जन्माष्टमी देखील आपल्याकडे थाटमाटात आणि उत्साहात साजरी केली जाते. लाडक्या कृष्णाचा वाढदिवस आपण आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करतो. (Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi)

त्याचबरोबर आपण कृष्ण जन्माष्टमीला आपल्या प्रियजनांना संदेश पाठवून शुभेच्छा देतो. मात्र ऐनवेळी संदेश काय लिहायचा हे सुचत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी १२ सर्वोत्कृष्ट संदेश घेऊन आलो आहोत. जेणेकरुन तुम्ही हे संदेश सहज आपल्या मित्रांना फॉरवर्ड करु शकता. (Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi)

१. कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान श्रीकृष्णाला आमचा शतश: प्रणाम
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

२. जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा

३. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला लोक म्हणतात,
’हे तुला कधीच जमणार नाही’
दहीहंडीला आम्ही उंचावरून कोसळतो
ते फक्त पुन्हा उभं राहण्यासाठी
तुम्ही आयुष्यात असेच उंच उंच शिखर गाठावे, ही सदिच्छा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

४. रुप मोठे प्रेमळ आहे, चेहरा त्याचा निराळा
श्रीकृष्णाचे नाव घेता, राक्षस संकटांचा पळाला
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

५. ढगांच्या आडून चंद्र हासला,
आकाशी ताऱ्यांचा रास रंगला,
कृष्ण जन्मला गं बाई कृष्ण जन्मला.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

६. भगवान कृष्णाच्या
मंत्रमुग्ध करणाऱ्या
बासरीने
तुमचे जीवन मधुर सुरांनी
आणि दैवी आशीर्वादाने भरून जावो.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

७. राधेची भक्ती
बासरीचा स्वर
लोण्याचा स्वाद
आणि गोपिकांचा रास
मिळून साजरा करुन
जन्माष्टमीचा सण खास

८. दह्यात साखर
आणि साखरेत भात.
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ.
फोडूया हंडी लावून उंच थर,
आपल्या मस्तकावर कृष्णाचा हात. (Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : टी-२० विश्वचषका दरम्यान डीआरएस निर्णयावरून एवढा वाद का होतोय?)

९. नंदाचा तो नंद
लावी मज छंद
मी झालो दंग
सृष्टीचा चित्रकार
देई मनास आकार
मी झालो निराकार

कृष्णाच्या भक्तीत रंगून जाऊया चला…

१०. कृष्ण म्हणतो,
“कर्माचे फळ व्यक्तीला, अशा प्रकारे शोधून काढते,
जसे वासरू कळपात असलेल्या, गायींमधून आपल्या आईला शोधते.”

त्यामुळे चांगले कर्म करा… भगवान कृष्णाच्या सानिध्यात रहा.

११. कृष्ण उवाच,
“अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात,
पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात.”

म्हणूनच बुद्धिमान व्हा आणि विश्व कल्याणाचा विचार करा.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

१२. कृष्ण कधी असा तर कधी तसा.
गरीब सुदामाचं स्वागत आदराने करतो
महाभारतात अर्जूनाच्या पाठिशी उभा राहतो.
कृष्णासारखा मित्र तुम्हालाही लाभो.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy Krishna Janmashtami Wishes In Marathi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.