एप्रिल-मे महिना आला की, आतुरता लागते कोकणातील आंब्याची! कोकणातील हापूस आंबा हे सर्वांचे आवडते फळ त्यामुळे आंब्यांच्या पेट्यांना बाजारात मोठी मागणी असते. परंतु आता आंब्यांचा हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला असला तरी अद्याप हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्यात आलेला नाही. किरकोळ बाजारात एक डझन आंब्यांचा दर एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत आहेत. अक्षय तृतीयेसाठी बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र, ती अपेक्षेएवढी नसल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.
( हेही वाचा : पोलीस दलात ७ हजार २३१ पदांची भरती! )
आंब्यांची आवक अपेक्षेएवढी झाली नाही
यंदा आंब्यांचा हंगाम मार्च महिन्यापासूनच सुरू झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आंब्यांची आवक अपेक्षेएवढी झाली नाही. कोकणातील हवामान बदलाचा फटका आंब्याला बसला. त्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणात पुन्हा पावसाळी वातावरण आहे. काही भागांत पाऊसही झाला आहे. अक्षय तृतीयेसाठी पुणे, मुंबईसह राज्यभरातून आंब्याला मागणी वाढू शकेल. पण, अद्याप आंब्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. किरकोळ बाजारात एक डझन हापूस आंब्यांचे दर प्रतवारीनुसार ९०० ते १२०० रुपये दरम्यान आहेत.