हापूसचा हंगाम अंतिम टप्यात… राहिले फक्त १५ दिवस

122

यंदा मान्सूनच्या आगमनामुळे कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्यात आहे. मे अखेरपर्यंत बाजारात हापूसची आवक होईल त्यानंतर मात्र हापूसची आवक कमी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आता फक्त आणखी पंधरा दिवस हापूसची चव चाखता येईल. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात हापूसचे दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात डझनाचा हापूसचे दर 300 ते 600 रुपये एवढे आहेत.

( हेही वाचा : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलाढाल )

हापूसचा हंगाम अंतिम टप्यात

तापमान, ढगाळ वातावरण, वादळ आणि अवकाळी पावसाच्या भितीने कोकणातील शेतकरी हापूस आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाजारात पाठवत आहेत. आवक वाढल्यामुळे हापूसच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. घटलेले दर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी पंधरा दिवस कोकणातील हापूसची चव चाखता येईल. त्यानंतर मात्र केवळ इतर गावरान आंबा बाजारात येईल.

हवामान बदलामुळे यंदा हापूस आंब्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात हापूस आंब्याचे आगमन झाले. त्यानंतर मार्च महिन्यात हापूसची आवक नियमित झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.