आजकाल आरोग्यादायी जीवन जगण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. कोणी त्यासाठी दिवसातून फक्त एकदा जेवतं तर कुणी दुपारी जेवतं आणि रात्री फलाहार करतं. डायटच्या इतक्या पद्धती उपलब्ध असल्या तरी तुमच्या शरीराला नेमकी कोणती पद्धत साजेशी आहे, हे शोधणं अवघड आहे.
( हेही वाचा : केरळात ट्रेनमध्ये जाळपोळ करणारा महाराष्ट्रात ‘या’ राज्यात अटक)
तुमच्या शरीराला साजेसा असा उत्तम डाएट प्लॅन शोधण्याचा प्रवास आता संपलाच असा समजा! जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये ज्याचा समावेश होतो, त्या हार्वर्ड विद्यापीठातील अभ्यासकांनी २०११ मध्ये अभ्यासाअंती सर्वसमावेशक डाएट प्लॅन प्रस्तुत केला होता. हा डाएट प्लॅन “हार्वर्ड डाएट प्लॅन” या नावाने प्रचलित आहे. या प्लॅनमुळे तुम्ही टाईप टू डायबीटीज, कॅन्सर, हृदयाचे विकारांपासून स्वत:चे संरक्षण करू शकता असा दावा हार्वर्ड विद्यापीठामार्फत करण्यात आला आहे. जर तुमची जीवनशैली आरोग्यादायी नसेल तर तुम्हाला नानाविध विकार होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर हे डाएट फॉलो केले तर असे रोग होण्याची शक्यता ११ टक्यांनी कमी होते.
काय खायचं?
१. हिरव्या पालेभाज्यांचा समावेश रोजच्या आहारात असल्या पाहिजे.
२. ब्राऊन राईस
३. मासे
४. चिकन
५. या तेलांचा वापर करा – ऑलिव्ह, सनफ्लॉव्हर, पिनट
६. दुपारच्या/रात्रीच्या जेवणात शिजवलेल्या अन्नपदार्थांपेक्षा फळभाज्या, फळांचे प्रमाण जास्त असले पाहिजे.
काय खायचं नाही?
१. प्रदीर्घ प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका.
२. जास्त साखर असलेले पदार्थ टाळा.
३. बटाटा टाळा.
४. दुध, दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात खाऊ नका.
५. फळांचा रस पिण्यापेक्षा पूर्ण फळे खा.
कुठलाही बदल जर अचानक शरीरावर लादण्यात आला, तर त्याचे शरीरावर नकारात्मक परिमाण होणे स्वाभाविक आहेत. म्हणूनच या डाएट प्लॅनमध्ये तुम्ही जे खात आहात ते तडकाफडकी सोडून देण्याची आवश्यकता नसून वरील गोष्टींचा आहारात समावेश करून उत्तम जीवनशैली जगणे अपेक्षित आहे.
फक्त हे विसरू नका –
१. नियमित व्यायाम करा.
२. अति गोड, अति तेलकट पदार्थ खाऊ नका.
३. ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करा.