गोव्यातील Arpora Saturday Night Market मध्ये गेला आहात का कधी?

41
गोव्यातील Arpora Saturday Night Market मध्ये गेला आहात का कधी?

अर्पोरा इथलं सॅटरडे मार्केट नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यांच्या कालावधीत संध्याकाळी ४ ते रात्री ११च्या दरम्यान सुरू असतं. हे सॅटरडे नाईट मार्केट उत्तर गोव्यातल्या अर्पोरा येथे अंजुना बीचपासून ४.३ किलोमीटर आणि बागा बीचपासून ३.७ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.

तसंच हे मार्केट पणजीच्या उत्तरेस १७.७ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या मार्केटला Ingo’s Night Market असंही म्हणतात. हे मार्केट फक्त खरेदीसाठीच नाही तर अस्सल गोव्यातलं वातावरण अनुभवण्यासाठीही उत्तम ठिकाण आहे. पार्ट्या करणाऱ्यांसाठी इथे पार्टी झोन आहेत. तसंच ऑर्गेनिक सॅलड्स, चॉकलेट वॅफल्स, ग्रीक फूड आणि स्थानिक रुचकर पदार्थ मिळणारे म्युझिक-बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. या मार्केटमध्ये तुम्ही कपडे, पिशव्या, मसाले, ट्रेंडी दागिने, हॅंडीक्राफ्ट्स, चामड्याचे सामान, शूज, विदेशी दिवे आणि बरेच काही खरेदी करू शकता. (Arpora Saturday Night Market)

(हेही वाचा – Mercedes-Benz AMG GT Coupe : मर्सिडिझ बेंझची पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि कूप गाडी लाँचच्या तयारीत )

अर्पोरा इथलं नाईट मार्केट हे युरोपियन आणि भारतीय अशा दोन्ही बाजूंच्या पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करतं. हे मार्केट परदेशी पर्यटकांमध्ये विशेषतः हिप्पी संस्कृतीमध्ये लोकप्रिय आहे. इथे तुम्हाला युरोपियन लोकांकडून चालवले जाणारे अनेक स्टॉल्स सापडतील. या स्टॉल्समुळे इथल्या मार्केटचं वातावरण कॉस्मोपॉलिटन बनतं.

याव्यतिरिक्त अर्पोरा इथे बागा बीच लागत असलेलं मॅकीज सॅटरडे नाईट मार्केट हे आकाराने खूपच लहान आहे. अर्पोरा हे एक लहानसं गाव आहे. इथे राहण्यासाठी फार कमी जागा आहेत. पण तरीही तुम्हाला गोव्यातल्या बागा आणि अंजुना नद्यांच्या शेजारच्या रिसॉर्ट असलेल्या भागामध्ये अनेक व्हिला आढळतील. (Arpora Saturday Night Market)

(हेही वाचा – Bhiwandi मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक)

अर्पोरा नाईट मार्केट कुठे भरते?

हे मार्केट उत्तर गोव्यातील अर्पोरा नावाच्या गावात भरते. हे गाव अंजुना बीचपासून ४.३ किलोमीटर आणि बागा बीचपासून ३.७ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. जर तुम्ही दक्षिणेकडून उत्तर गोव्याकडे जात असाल तर अगुआडा-सिलोईम रोडच्या उजव्या बाजूला हे मार्केट लागेल.

या मार्केटची वेळ काय आहे?

हे मार्केट दरवर्षी नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये दर शनिवारी दुपारी ४ ते रात्री ११च्या दरम्यान भरतं. पण तुम्हाला ते डिसेंबरच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काळातच पूर्णपणे गजबजलेलं दिसेल. इतर वेळी इथले अनेक स्टॉल्स बंद असू शकतात. पीक सीझनमध्ये हे मार्केट रात्री उशिरापर्यंत म्हणजेच १२ पर्यंत आणि त्यानंतरही सुरू राहते. (Arpora Saturday Night Market)

(हेही वाचा – Jammu and Kashmir : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुुरुवात)

हे मार्केट किती मोठे आहे?

अर्पोरा मार्केट हे शेकडो स्टॉल असलेली मोठी बाजारपेठ आहे. या मार्केटच्या जवळ असलेल्या मॅकी मार्केटच्या तुलनेने हे आकारानेही खूप मोठे आहे.

सॅटरडे मार्केटमध्ये तुम्ही येथे काय खरेदी करू शकता?

या मार्केटमध्ये तुम्ही कपडे, पिशव्या, मसाले, ट्रेंडी दागिने, हॅंडीक्राफ्ट्स, चामड्याचे सामान, शूज, विदेशी दिवे आणि बरंच काही खरेदी करू शकता.

इथल्या सामानाच्या किंमती

या मार्केटमध्ये वस्तूंच्या किंमती जास्त आहेत. पण तुम्ही नेगोशीएट करू शकता. इथे क्रेडिट/डेबिट कार्ड सहसा स्वीकारले जात नाहीत.

(हेही वाचा – M. S. Dhoni : महेंद्रसिंग धोनी अमेरिकेत घालवतोय सुट्टी; दिसला ‘या’ खेळाच्या मैदानावर )

अर्पोरा नाईट मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचं अन्न मिळतं?

या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या स्टॉल्ससोबत खाण्याचेही स्टॉल्स आणि दुकाने आहेत. इथे तुम्ही भारतीय, कोकणी आणि खंडीय सॅलड, रोस्ट चिकन, इटालियन, रशियन, ग्रीक पाककृती आणि सीफूड टेस्ट करू शकता. इथे अनेक पब्स आणि कॉकटेल बारही आहेत. (Arpora Saturday Night Market)

प्रवेश-पार्किंग

या मार्केटमध्ये प्रवेश विनामूल्य आहे. तसंच मर्यादित पार्किंगची जागा उपलब्ध आहे.

हे मार्केट तीन झोनमध्ये विभागलं जाऊ शकतं –

  • लोअर झोन – येथे तुम्हाला संपूर्ण भारतातील स्थानिक उत्पादने मिळतील. याव्यतिरिक्त युरोपियन स्टॉल्समध्ये अनेक पोशाखांची विक्री केली जाते.
  • सेंट्रल झोन – इथे फूड स्टॉल्स आणि सेंट्रल फील्ड आहे.
  • अप्पर झोन – या ठिकाणी डिझायनर स्टॉल्स आणि बुटीक आहेत.

(हेही वाचा – Xavier’s College, Mumbai : मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेज का आहे एवढं सुप्रसिद्ध?)

सेंट्रल फील्ड येथे तुम्हाला थेट संगीत आणि परफॉर्मन्ससाठी स्टेज दिसेल. अनेक परदेशी बँड आणि काही स्थानिक गोवा बँड येथे परफॉर्म करतात. इथे दोन्ही बाजूला पब आणि बार आहेत. तसंच एक मोठं रिकामं मैदान नाचणाऱ्या माणसांनी भरून गेलेलं दिसेल. इथे तुम्हाला बाजीगर आणि फायर डान्सर यांसारखे कलाकार त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करताना दिसतील.

अर्पोरा नाईट मार्केट हे अशा दुर्मिळ ठिकाणांपैकी एक आहे जिथे भारतीयांपेक्षा जास्त परदेशी पर्यटक येतात. इथले अनेक स्टॉल्स हे युरोपीय लोकही चालवतात. हे युरोपीयन लोक गोव्याचे दीर्घकाळापासून रहिवासी आहेत. तुम्हाला स्पॅनिश, रशियन, जर्मन, फ्रेंच, कोंकणी, हिंदी आणि इतर भाषा बोलणारे लोक आसपास दिसतील. बरेच स्थानिक विक्रेते रशियन किंवा यिद्दीश सारख्या परदेशी भाषा अस्खलितपणे बोलू शकतात. जगभरातल्या वेगवेगळ्या सांस्कृतीचा प्रभाव इथे तुम्हाला पाहायला मिळेल. (Arpora Saturday Night Market)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.