HCL Technologies Share Price : एचसीएल टेकमधील रोशनी नादर यांच्या गुंतवणुकीला सेबीचा हिरवा कंदील

HCL Technologies Share Price : हेचसीएल टेकच्या शेअरमध्ये शुक्रवारी मोठी उसळी बघायला मिळाली. 

37
HCL Technologies Share Price : एचसीएल टेकमधील रोशनी नादर यांच्या गुंतवणुकीला सेबीचा हिरवा कंदील
  • ऋजुता लुकतुके

एचसीएल समुहाचे संस्थापक आणि मालक शिव नादर आहेत आणि त्यांच्या समुहातील दोन कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी रोशनी नादर मल्होत्रा यांना सेबीने हिरवा कंदील दाखवला आहे. नादर कुटुंबीयांनी शिव नादर यांच्या पश्चात कौटुंबिक संपत्तीचं वाटप केलं आहे आणि त्यानुसार, रोशनी नादर यांना एचसीएल टेक प्रमोटर असलेल्या दोन कंपन्यांमध्ये मक्तेदारी मिळणार आहे. एचसीएल टेक समुहाचा या कंपन्यांमधील हिस्सा ६८ टक्के इतकाच असणार आहे. पण, वैयक्तिक सर्वाधिक मालकी ही रोशनी नादर यांच्याकडे जाईल. (HCL Technologies Share Price)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी मानले महाराष्ट्राच्या जनतेचे आभार)

वामा सुंदरी इन्व्हेस्टमेंट्स आणि एचसीएल कॉर्प या दोन कंपन्यांची मक्तेदारी आता रोशनी यांच्याकडे जाईल. एचसीएल कॉर्प ही देशातील आघाडीची बँकेतर वित्तीय संस्था आहे आणि कंपनीला रिझर्व्ह बँकेचा परवानाही मिळालेला आहे. वामा सुंदरी कंपनीची एचसीएल टेकमधील हिस्सेदारी तब्बल ४४ टक्क्यांची आहे. तर एचसीएल कॉर्पची हिस्सेदारी ही ०.७१ टक्के इतकी आहे. शेअर हस्तांतरणाच्या या बातमीने शेअर बाजारातही एचसीएलटेक विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. कंपनीला भविष्यात नवीन नेतृत्व मिळणार असल्याचं गुंतवणूकदारांनी स्वागत केलं आहे आणि कंपनीचा शेअर शुक्रवारी साडेतीन टक्क्यांनी वधारून १,८९७ अंशांवर बंद झाला आहे. (HCL Technologies Share Price)

(हेही वाचा – झारखंडमध्ये Jharkhand Mukti Morcha पुन्हा सत्तेत, एनडीए आघाडीला २४ जागांवर विजय)

New Project 2024 11 23T225018.985

रोशनी नादर या शिव नादर यांची कन्या आहेत आणि नादर यांनी त्यांच्या पश्चात आपल्या संपत्तीची सर्व जबाबदारी रोशनी यांच्यावर सोपवली आहे. १९९० मध्ये नादर यांनी एचसीएल टेकची स्थापना केली, तेव्हाही रोशनी कंपनीत व्यवस्थापक होत्या. आणि आता शिव नादर ७९ वर्षांचे झाल्यामुळे त्यांनी हळू हळू कंपनीतून अंग काढून घ्यायला सुरुवात केली आहे. आणि रोशनी नादरच सध्या हेचसीएल टेकच्या अध्यक्ष आहेत. रोशनी यांच्याकडे सर्वाधिकार सोपवण्याच्या दृष्टीने नादर यांनी वामा सुंदरी कंपनीच्या आपल्याकडे असलेल्या ५१ टक्के हिस्सेदारी पैकी ४७ टक्के हिस्सेदारी रोशनी यांना देऊ केली आहे. तसंच एचसीएल क़ॉर्पमध्येही ४७ टक्के हिस्सेदारी रोशनी यांना मिळणार आहे. (HCL Technologies Share Price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.