HDFC Manufacturing Fund : एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंडाविषयी ५ महत्त्वाच्या गोष्टी

HDFC Manufacturing Fund : एचडीएफसी मॅन्युफॅक्टरिंग फंड हा उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड आहे.

59
HDFC Manufacturing Fund : एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंडाविषयी ५ महत्त्वाच्या गोष्टी
  • ऋजुता लुकतुके

सेबीने भारतातील म्युच्युअल फंड कंपन्यांना थीमवर आधारित म्युच्युअल फंड सुरू करण्याची परवानगी दिली, त्यानंतर प्रसिद्ध झालेला एक म्युच्युअल फंड म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फंड. यात म्युच्युअल फंड कंपनी फक्त उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्येच गुंतवणूक करते. आपल्याकडे उपलब्ध पैशांपैकी ८० टक्के भांडवल हे फंड उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांचे रोखे किंवा या कंपन्यांच्या बाँड, डिबेंचरमध्येच गुंतवत असतात. (HDFC Manufacturing Fund)

(हेही वाचा – Theft : नव्या सरकारच्या शपथविधीत चोरट्यांची ‘हात की सफाई’; १२ लाखांचा ऐवज लंपास)

उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी शेअर बाजारात जशी सुधारले तसे तुमच्या फंडाची किंमतही वाढेल, हे उघड आहे. इतर कुठल्याही म्युच्युअल फंडाप्रमाणे इथंही चांगले पैसे उभे राहण्याच्या दृष्टीने किमान ३ वर्षांची गुंतवणूक आवश्यक असल्याचं जाणकार सांगतात. १६ मे २०२४ ला एचडीएफसी म्युच्युअल फंड सुरू झाला आहे आणि यातील गुंतवणुकीची जोखीम खूप जास्त असल्याचं (व्हेरी रिस्की) सेबीनेच आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. अगदी १०० रुपयांपासून इथं तुम्हाला एसआयपी सुरू करता येते. (HDFC Manufacturing Fund)

(हेही वाचा – ICICI Manufacturing Fund : आयसीआयसीआय मॅन्युफॅक्चरिंग फंडाविषयी ५ महत्त्वाच्या गोष्टी)

आता एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंडाविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया,

फंड नाव – एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंड

ताजी एनएव्ही – १०.५९ (२९ नोव्हेंबर २०२४)

एंट्री लोड – शून्य

फंडात एकूण गुंतवणूक – १२,७७१.८८ कोटी रु.

एक्झिट लोड – गुंतवणुकीनंतर एका महिन्याच्या आत पैसे काढून घेतल्यास १ टक्के एक्जिट लोड. बाकी एक्जिट लोड लागू नाही

फंड मॅनेजर – राकेश सेठिया व ३४ फंड मॅनेजरचा चमू

परदेशातील गुंतणुकीसाठी फंड मॅनेजर – ध्रुव मुच्छल

गुंतवणूक – फंडाने टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, सिप्ला, अरबिंदो फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, डिव्हीज लॅब या प्रमुख कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. (HDFC Manufacturing Fund)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.