मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा करण्याचे अनेक फायदे आहेत. शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदे ध्यानधारणेमुळे मिळतात. आपल्या मनातील नकारात्मक विचार कमी करून मानसिक स्थिती अधिक चांगली करण्यासाठीही याचा उपयोग होतो. मात्र ध्यानधारणा करण्याची एक विशिष्ट वेळ आहे ती पाळणे गरजेचे आहे. ध्यानधारणा करण्याची पद्धत असून हे नियम फॉलो करावेत.
हेही पहा –
तुम्हाला आरोग्यासाठी ध्यानाचा फायदा करून घ्यायचा असेल तर हा लेख तुम्ही वाचायला हवा. योग प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी ध्यानधारणेची योग्य वेळ आणि पद्धत तसेच ध्यानधारणेचे फायदे सांगितले असून तुम्हीही ते जाणून घ्या. जेणेकरून तुम्हालाही ध्यानधारणेचा फायदा करून घेता येईल.
उपाशीपोटी ध्यानधारणा करावी का?
उपाशीपोटी ध्यानधारणा करणे हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर ध्यानधारणा केल्याने तुम्हाला झोपही लागू शकते, जे योग्य नाही. त्यामुळे शांत वातावरणात, सकाळी उपाशीपोटी शांत मनाने उत्साही राहून मेडिटेशन करणे अधिक योग्य आहे. सकाळी नक्की कोणत्या वेळी ध्यानधारणा करावी असाही प्रश्न उपस्थित होतो. याचेही उत्तर घ्या जाणून. Immunity Booster म्हणूनही याचा उपयोग होतो.
कोणत्या वेळी करावे ध्यान
ध्यानधारणा तुम्ही खरं तर दिवसातून कधीही करू शकता. मात्र हे करण्याची योग्य वेळ सकाळी आहे. यामागील कारणं असं आहे की, सकाळी तुम्ही उठल्यानंतर उत्साही आणि ताजेतवाने असता, याशिवाय आजूबाजूचे वातावरणही फ्रेश असते आणि गडबड गोंधळ नसतो. त्यामुळे ध्यानधारणा करणे अधिक सोपे असते. सकाळच्या वेळी मन भरकटत नाही आणि तुम्ही मेडिटेशन करताना लक्ष केंद्रित करू शकता. याचा चांगला परिणाम शरीर आणि मनावर होताना दिसतो.
किती वेळ करावे ध्यान?
दरदिवशी साधारण २० मिनिट्स ते अर्धा तास ध्यानधारणा करावी. अर्धा तास रोज ध्यानधारणा केल्याने तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होते. याशिवाय विचार केंद्रीत होतात आणि मन शांत होतो. अनादी काळापासून योगामध्ये याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. याशिवाय तुम्ही दिवसभरात ३ वेळा १०-१० मिनिट्सही वेगवेगळ्या सेशन्समध्ये ध्यानधारणा करू शकता.
ध्यान करताना शब्द बोलण्याची गरज आहे का?
खरं तर ध्यानधारणा ही तुमच्या मानसिक शांततेसाठी करण्याची गरज आहे. मेडिटेशन करताना तुम्ही अगदी एक एक शब्दाची निवड करण्याची गरज आहे. हे एक प्रकारचे वायब्रेशन आहे. उदाहरणार्थ ॐ, ओम शब्दाचे उच्चारण तुमचे लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. तुम्ही जर ध्यानधारणा करत नसाल तर सध्याच्या ताणतणावाच्या या वातावरणात रोज १० मिनिट्सपासून सुरूवात करा आणि फरक पाहा.
ध्यानधारणेचा फायदा
- १. ध्यानाचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही फायदा होताना दिसतो. नक्की कोणते फायदे ध्यानामुळे होतात जाणून घ्या
- २. उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत
- ३. मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी अर्थात डोकेदुखी, अनिद्रा, सांधेदुखी तक्रारी कमी होतात
- ४. मन शांत होऊन मूड सुधारण्यास मदत आणि विचार करण्याची क्षमता वाढते
- ५. भावनात्मक स्थिरता वाढण्यास फायदा होतो, अनामिक भीती कमी होते
- ६. परिस्थिती समजून घेऊन त्यावर आकलनशक्ती वाढवून निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि समस्या लहान वाटतात