प्रत्येक व्यक्तिची दिवसाची सुरुवात आनंददायी, उत्साही झाली की, संपूर्ण दिवस चांगला जातो. याकरिता सकाळी (Morning) उठल्यावर (Health Tips) मन आणि शरीराचा उत्साह वाढवणाऱ्या कृती करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया, अशा दहा गोष्टी ज्यामुळे आपण आपल्या दिवसाची सुरुवात आनंदात व्हायला मदत होईल.
सकाळी लवकर उठा
लवकर उठे लवकर झोपे तया आरोग्य ज्ञान संपत्ती मिळे, असे वचन पुरातन काळापासून प्रचलित आहे. या वचनाप्रमाणे आपल्या दिनचर्येत बदल करून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. यामुळे ताणतणाव दूर होतात, शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळून दिवसाची सुरुवात हलकीफुलकी व्हायला मदत होते. ताणतणावही नाहिसे होऊ शकतात.
आपले शरीर हायड्रेट करा
उठल्यावर कॉफी, चहा अशी पेये पिण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट व्हायला मदत होईल. यामुले शरीरात रात्रभरात तयार झालेले विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होईल.
कृतज्ञता व्यक्त करा
आपण ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात त्याबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. कृतज्ञतेचा सराव केल्याने तुमचा मूड सुधारू शकतो आणि तुमचे लक्ष तुमच्या जीवनातील सकारात्मक पैलूंवर केंद्रित होऊ शकते.
पौष्टिक नाश्ता
नाश्त्याची ठराविक वेळ निश्चित करून घ्या. त्या वेळेत शरीराला पोषक आहार घ्या. यामुळे दिवसभरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळायला मदत होईल. नाश्त्यामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. सकाळच्या न्याहारीमध्ये फळे, प्रथिनयुक्त आहार घ्या.
व्यायाम करा
सकाळचा व्यायाम शरीराला आणि मनाला ऊर्जा देऊ शकतो. व्यायाम, जॉगिंग, योगासने, स्ट्रेचिंग असे शरीराला आवश्यक असे व्यायामप्रकार केल्याने ऊर्जा वाढते. उत्साही, ताजेतवाने वाढते. निराश दूर होऊन मूड सुधारायला मदत होते.
दररोज वाचा आणि नवीन शिका
काहीतरी नवीन वाचण्यासाठी किंवा शिकण्यासाठी थोडा वेळ काढा. पुस्तकातील धडा, बातम्या, लेखचा लेख असो…असे रोज नवनवीन गोष्टींचा वाचनात समावेश करा.