Health Tips : नियमितपणे ‘हे’ केल्याने कोलेस्ट्रॉल होईल दूर

कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे हृदयाचं आरोग्य धोक्यात येऊ लागल्याने कार्डिअॅक अरेस्ट आणि स्ट्रोकच्या समस्यादेखाल वाढत आहेत.

140
Health Tips : नियमितपणे 'हे' केल्याने कोलेस्ट्रॉल होईल दूर
Health Tips : नियमितपणे 'हे' केल्याने कोलेस्ट्रॉल होईल दूर

सध्याच्या काळामध्ये बिघडलेली जीवनशैली आणि राहणीमान यामुळे कोलेस्ट्राॅलची समस्या वाढत जाताना दिसत आहे. केवळ जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्येच नव्हे तर तरुणांमध्ये देखील कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते आहे. (Health Tips)

कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे हृदयाचं आरोग्य धोक्यात येऊ लागल्याने कार्डिअॅक अरेस्ट आणि स्ट्रोकच्या समस्यादेखाल वाढत आहेत. तेलकट तिखट पदार्थाचं सेवन टाळणं गरजेचं आहे. तसचं ताण कमी घेणं आणि व्यायाम करणं या सवयींमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. जर तुम्हाला व्यायाम करणं शक्य नसेल तर नियमितपणे एक काम केल्यास तुमची कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होण्यास मदत होते. नियमितपणे वॉक करणं म्हणजेच चालण्याने हृदयाचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. दररोज ३० मिनिटं चालण्याने हृदय निरोगी राहतं. जरी तुम्हाला वर्कआऊट किंवा व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तरी दररोज ३० मिनिटं चालण्याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होण्यासोबतच आरोग्याच्या इतर समस्या दूर होवून फिट राहण्यास मदत होते.

चालण्यामुळे कोलेस्ट्रॉल होईल कमी

Walking.heartfoundation.org च्या रिपोर्टनुसार चालण्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. चालण्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढल्याने नसांमधील रक्तप्रवाह वाढतो. यामुळे नसांमध्ये साचलेलं बॅड कोलेस्ट्रॉल वितळण्यास मदत होते. चालण्यामुळे धमन्यांचं आरोग्य चांगल होवून स्ट्रेस कमी होतो.

National library of Medicine या मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार दररोज ३० मिनिटं वॉक केल्याने धमन्यांमध्ये साचलेलं फॅट लिपिड आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. चालण्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. तसंच यामुळे मेंदू आणि इतर अवयव निरोगी राहण्यास मदत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.