आरोग्यासाठी फायदेशीर आणि पौष्टिक खजुरांमध्ये अनेक पोषक तत्त्वांचा (health tips) खजिना आहे. अत्यंत स्वादिष्ट असणाऱ्या खजुरात अँण्टिऑक्सिडंट आढळतात. भिजवलेले खजूर रिकाम्यापोटी खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढले. कॅल्शियम आणि मॅग्निशियम यासारखे पोषक घटकही शरीराला पुरेशा प्रमाणात प्राप्त होतात. हाडांचे आणि ह्रदयाचे आरोग्य सुधारते. हिवाळ्यात रिकाम्यापोटी भिजवलेले खजूर खाल्ले तर आरोग्याला कोणते फायदे होऊ शकतात, जाणून घेऊया –
खजूर खाल्ल्याने ह्रदयाचे आरोग्य सुधारते. ह्रदयविकाराचा, स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यात अँण्टीऑक्सिडंट्स, हायपोलिपिडेमिक, अँण्टी इंफ्लेमेटरी आणि अँण्टी अपोप्टोटिक असतात. जे स्ट्रोक आणि ह्रदयविकाराचा धोका कमी करतात.
(हेही वाचा – Delhi Air Pollution : दिल्लीची हवा झाली विषारी; पीएम २.५ आणि पीएम १० ची संख्या वाढली )
भिजवलेले खजूर रिकाम्यापोटी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारायला मदत होते. चयापचय क्रिया सुधारते. पोटाशी संबंधित आजार दूर होऊ शकतात.
ज्यांना वजनवाढीवर नियंत्रण ठेवायचे आहे, त्यांनी नाश्त्यामध्ये खजुराचा समावेश करावा. खजूर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. कॅलरी बर्न होतात.
भिजवलेले खजूर खाल्ल्याने शरीराला लोह मिळते. त्यामुळे थकवा कमी होतो. शरीलाला ऊर्जा मिळते.
खजूर खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. खजुरामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.
हेही पहा –