Health Tips : हिमोग्लोबिन कमी झालंय, आहारात करा ‘या’ 4 पदार्थांचा समावेश

रक्ताच्या माध्यमातून शरारीला ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पोहोचतात.

178
Health Tips : हिमोग्लोबिन कमी झालंय, आहारात करा 'या' 4 पदार्थांचा समावेश
Health Tips : हिमोग्लोबिन कमी झालंय, आहारात करा 'या' 4 पदार्थांचा समावेश

शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास थकवा, कंटाळा आल्यासारखं वाटणं, मूड स्विंग होणं, अशक्तपणा ही लक्षणे जाणवू शकतात. रक्ताच्या माध्यमातून शरारीला ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पोहोचतात. शरीराच्या या अवस्थेला अॅनिमिया असे म्हणतात. रक्ताची कमतरता उद्भवल्यास आहारात ( diet ) ‘या’ पदार्थांचा समावेश करणे (Health Tips) आवश्यक आहे.

बिटाचा रस
बीटात आयर्नचे प्रमाण भरपूर असते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्व सी असते. बीट खाल्ल्याने रक्तातील लाल पेशी वाढण्यास मदत होते. बीट, गाजर, काकडीचा तुकडा घालून हा ज्यूस (Juice) पिऊ शकता.

हिरव्या भाज्यांचा रस
हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. याच्या सेवनाने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. ग्रीन ज्यूस म्हणजेच पालक, संत्री, मोसंबी या फळांचाही समावेश करावा. ग्रीन ज्यूसमध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, जीवनसत्त्व सी, फॉलेट, कॉपर आणि जीवनसत्त्व ए (Iron, folic acid, vitamin C, folate, copper and vitamin A) असते. यामुळे रक्ताची कमतरता भरून काढायला मदत होते.

पालक ज्यूस
पालक, काजू, रास्पबेरी या भाज्या शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करतात. हा ज्यूस प्यायला खूपच चवदार असतो. पालकाच्या ज्यूसमध्ये बदाम किंवा खोबऱ्याचे तुकडे मिसळा.

डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रक्ताची कमतरता भरून निघते. अशक्तपणा दूर होतो. मधल्या वेळेत भूक लागल्यावर गूळ चणे, गूळ शेंगदाणे, खजूर, गूळ आणि तीळ खाणे फायदेशीर ठरते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.