तुमच्या नखांच्या रंगावरून जाणून घ्या आरोग्यस्थिती

162

कोणत्याही महिलेला आपले केस आणि हाताची नखं यावर विशेष प्रेम असते. त्यामुळे त्या त्याची विशेष काळजी घेताना दिसतात. आपली नखं ही विशेषतः केरॅटिनपासून तयार होत असतात. केरॅटिन हे एक प्रकारचे प्रथिनं असते. जे केसांसाठी आणि नखांसाठी महत्त्वाचे मानले जाते. ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते त्यावेळी त्याचा परिणामही केरॅटिनवर होतो आणि त्याचा परिणाम नखांवर दिसून येतो. अशावेळी नखांचा रंग बदलू शकतो. बऱ्याचदा आपली प्रकृती ठीक नसेल तर यावेळी डॉक्टरांकडून डोळे, नखं, आणि जीभ बघून रोगाचे निदान केले जाते. आपल्या नखांच्या रंगांवरून यकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती समजू शकते. जर तुमच्या नखांचा रंग सारखा बदलत असेल तर वेळीच सतर्कता बाळगली पाहिजे. कारण तेच शारीरिक समस्येचं प्रमुख लक्षण ठरू शकते.

(हेही वाचा – खिशाला परवडेल अशा खर्चात IRCTC देणार लेह-लडाखला भेट देण्याची संधी)

नखांचा पिवळा रंग

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलेले असल्याने तुमच्या नखांचा रंग पिवळा झालेला दिसतो. याशिवाय फंगल इन्फेक्शन, थॉयरॉईड, सिरोसिसमुळेही पिवळी पडू शकते. जर तुमची नखं पिवळी पडून जाड होऊन खूप हळू वाढत असतील तर तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित आरोग्य समस्या असू शकते.

नखांवर पांढरे डाग असल्यास…

नखांवर पांढरे डाग पडण्याची समस्या अनेकांना दिसून येते. या डागांचा आकार हळूहळू वाढताना दिसतो. ही समस्या जर तुम्हालाही असेल तर कावीळ किंवा यकृताशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला असण्याची शक्यता असू शकते.

नखांचा रंग निळसर होणे

कधी कधी नखांमध्ये निळसरपणा दिसून येतो. याचा अर्थ शरीरात ऑक्सिजनची कमतरता असण्याची शक्यता असते. हे फुफ्फुस किंवा हृदयरोग सूचित करते. तसेच, जर नखं कोरडी आणि तुटलेली असतील तर शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता दर्शवते. यामुळे हे थायरॉईडचं कारण असू शकते, असे सांगितले जात आहे.

नखं काळपट होणे

जर तुमची नखं काळी पडत असतील तर ते तुमच्या त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण मानले जाते. त्वचेच्या कर्करोगाची सुरुवात सौम्य वेदना आणि नखं काळी होण्यापासून सुरू होण्याची शक्यता असते. तसेच, बुरशीजन्य संसर्गामुळेही नखे काळी पडू शकतात. काही वेळा स्यूडोमोनास नावाच्या बॅक्टेरियाच्या वाढीमुळे नखे काळी किंवा हिरवी होऊ शकतात.

नखं पांढरी होणं

जर तुमच्या नखांचा रंग पांढरा दिसत असेल तर ते अशक्तपणा, हार्ट फेल्युअर, यकृताचे आजार आणि कुपोषण इत्यादींचे लक्षण असू शकते. तर नखांवर पट्टे हे व्हिटॅमिन-बी, बी-12 आणि शरीरातील झिंकची कमतरता दर्शवतं. जर तुमची नखं अर्धी पांढरी आणि अर्धी गुलाबी असतील तर शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे ते दिसण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.