तुळशीच्या बिया, पाने यामध्ये आरोग्यदायी गुणधर्म असतात. तुळशीचा वापर पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. तुळशी पानांना वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो. स्वयंपाकघरातही विशिष्ट पदार्थांमध्ये हल्ली तुळशीची पाने वापरली जातात. तुळशीच्या बियांना मंजिरी म्हणतात. यामध्ये अनेक पोषक गुणधर्म असतात. त्यामुळे आयर्वेदात तुळशीला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया – तुळशीचे आरोग्यदायी फायदे .
तुळशीच्या बिया हा जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही पोषक तत्त्वे असतात याशिवाय जीवनसत्त्वे ए, के आणि सी असल्यामुळे तुळशीच्या बिया आरोग्यासाठी आवश्यक असतात.
वाढत्या वजनावर नियंत्रण
तुळशीच्या बियांचा आहारात समावेश केल्यामुळे पोट भरलेले राहते. यामुळे वजनवाढीवर नियंत्रण राहाते. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी तुळशीच्या बिया हा सर्वोत्तम पर्याय आहे.
(हेही वाचा – Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांनी ‘उबाठा’ गटाला झापले! )
पचनविकारावर गुणकारी
तुळशीच्या बिया पचनाच्या समस्यांवर एक उत्तम नैसर्गिक उपाय आहेत. उच्च फायबर सामग्री आतड्यांच्या हालचालींचे नियमन करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी तुळशीच्या बिया खाव्यात. या बिया पाचक म्हणूनही काम करतात. यामुळे अपचन, अॅसिडिटी यासारखे त्रास दूर व्हायला मदत होते.
रक्तातील साखरेवर नियंत्रण
तुळशीच्या बिया रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. या बियांमधील फायबरमुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. त्यामुळे मधुमेही व्यक्तिंनी आहारात तुळशीच्या बियांचा समावेश करावा.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तुळशीच्या बियांमध्ये असलेले ओमेगा -३ फॅटी ऍसिड हृदयरोगाचा धोका कमी करून हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठीही या बिया गुणकारी आहेत. या बियांमुळे हृदय व रक्तवाहिन्यांचेही आरोग्य सुधारते.
तणाव कमी करणे
तुळशीच्या बियांमध्ये संयुगे असतात. ज्यामुळे ताणतणाव दूर व्हायला मदत होते. मानसिक शांतता मिळते.