निरोगी शरीरासाठी प्रत्येक अवयवाचं कार्य सुरळीत राहणं आवश्यक असतं. हृदय, मेंदू, किडनी, यकृत आणि फुफ्फुस हे अवयव निरोगी असल्यास संपूर्ण शरीर निरोगी राहाते. शरीरातील अवयवांपैकी फुफ्फुसं हा महत्त्वाचा अवयव. यामुळे शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे व्हावा यासाठी फुफ्फुसे निरोगी असणं गरजेचं आहे. फुफ्फुसे केवळ हवेतील ऑक्सिजनच ओढून घेत नाही तर हवेतील इतर हानिकारक वायूही शोषून घेत असतात. हानिकारक वायूमुळे दमा, ब्रोंकाइटिस, सिस्टिक,पायब्रोसिस आणि न्युमोनिया यसारखे श्वसनाचे विकार होण्याचा धोका वाढू शकतो. असे होऊ नये याकरिता आहारात काही भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे श्वसनाच्या आजारांपासून दूर व्हायला निश्चितच मदत होईल.
ब्रोकोली
निरोगी शरीरासाठी ब्रोकोलीचे अनेक फायदे आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच मोठ्या प्रमाणात कॅरोटीनॉयड, फॉलेट आणि फायटोकेमिकल्स आढळतात. ज्यामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय हानिकारक तत्वांशी लढण्यासाठी फुफ्फुस बळकट होण्यासही मदत होते. ब्रोकोलीमध्ये आढळणाऱ्या एल-सल्फोराफेन नावाच्या तत्त्वात असेल्या अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे श्वसनाचे आजार दूर होण्यास मदत होते. यासाठीच फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकता.
(हेही वाचा – Water Reduction : नवी मुंबई आणि नाशिकरांवर पाणीसंकट! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार )
भोपळा
भोपळ्यामुळे फुफ्फुस निरोगी राहातं. भोपळ्यामध्ये कॅरोटेनॉइड्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण आढळतात. भोपळ्याची भाजी आणि बियांच्या सेवनामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते.
टोमॅटो
टोमॅटो हे लायकोपीनचं एक उत्कृष्ट वनस्पती स्त्रोत आहे. टोमॅटोच्या सेवनामुळे फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं राहण्यास आणि श्वसनमार्गातील सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे टोमॅटोचा स्वयंपाकासाठी तसेच सलाडमध्ये समावेश करावा.
पालेभाज्या
पालेभाज्या खास करून केळं, पालक अशा भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन उपलब्ध असतात. या पोषक तत्त्वांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स गुण असतात. यामुळे फुफ्फुसांमधील सूज कमी होण्यास मदत होते.
हेही पहा –