काही वेळ उभे राहिल्यानंतर हातांना आणि पायांना, बोटांमध्ये मुंग्या यायला सुरुवात होते. (Health Tips) हा जीवनसत्वांच्या कमतरतेचा अभाव असू शकतो. आपल्या शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपल्या हाता-पायांना मुंग्या येतात. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
(हेही वाचा – Mumbai News : वांद्रे-वरळी सीलिंकवर बुलेट गर्लचा ड्रामा)
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात. उदाहरणार्थ पायांमध्ये पॅरेस्थेसिया, स्नायूंना क्रॅम्प येणे, चक्कर येणे, गोंधळणे, थकवा आणि नैराश्य यांसारख्या समस्या दिसतात. त्याचे सर्वात मोठे कार्य मज्जातंतूंना जोडणे आहे. यामुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि नसांची शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे नसांमध्ये मुंग्या येऊ लागतात. (Health Tips)
शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल, तर त्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही मांस, मासे, दूध, चीज आणि अंडी यांचे सेवन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच धान्याची भरडही तुम्ही खाऊ शकता. अल्कोहोल, कॉफी, प्रक्रिया केलेले अन्न यांच्या सेवनामुळे शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होऊ शकते. त्यामुळे असे अन्न पदार्थ टाळावे. हात आणि पायांना मुंग्या येण्याचे कारण केवळ व्हिटॅमिन बी 12 नाही तर इतर अनेक जीवनसत्त्वांचा अभाव आहे. (Health Tips)
रात्री झोपल्यानंतर आपल्या हाता-पायांना मुंग्या येऊ नयेत, म्हणून तुमच्या शरीरातील नसा संकुचित करू शकतील किंवा रक्त प्रवाह प्रतिबंधित करू शकतील अशी झोपची स्थिती टाळा. तुमचा मणका अलाईन ठेवणाऱ्या स्थितीत झोपण्याचा प्रयत्न करा. जसे की तुमच्या उशीने मानेला आधार द्या किंवा तुमच्या गुडघ्यांमध्ये उशी ठेवा. अशा काही उपायांमुळे तुमच्या झोपीच स्थिती सुधारु शकते.
मुंग्या येण्याची समस्या कायम राहिल्यास किंवा ती आणखी बिघडत चालली आहे, असे लक्षात आल्यास वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी. (Health Tips)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community