Health Tips : सुका मेवा खाण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, वाचा सविस्तर…

खजुरामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून वजनावरही नियंत्रण राहते.

192
Health Tips : सुका मेवा खाण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, वाचा सविस्तर...
Health Tips : सुका मेवा खाण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात, वाचा सविस्तर...

नवरात्रोत्सवात अनेकांचे उपवास असतात. काही जण उपवासाला फळांशिवाय काहीही खात नाही, पण काही जणांना उपवास करताना स्वादिष्ट पदार्थ खाण्याची आवड असते. नवरात्रोत्सवातील उपवासादरम्यान पोषक घटकांची कमतरता सुका मेवा भरून काढू शकतो. यामध्ये असलेले फायबर, प्रथिने आणि फॅट्स उत्तम ऊर्जेचा स्त्रोत आहेत. यामुळ सुका मेवा उपवासाच्या दिवशी भरपूर खावा. जाणून घेऊया याविषयी तज्ज्ञ (Health tips) काय सांगतात –

सुकामेवा हा जेवणाव्यतिरिक्त चांगला पर्याय आहे. त्यातील साखरेमुळे आपल्या शरीराला प्रथिने मिळतात. बटाट्याचे तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा सुका मेवा खाणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू नये म्हणून सुका मेवा, दूध आणि दह्यामध्येही मिसळून खाऊ शकता.

सुकामेव्यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक असतात. यामध्ये जीवनसत्त्वे, मिनरल्स कॅरोटिनॉइड्स आणि अँण्टिऑक्सिडंट्स यासारखे पोषक घटक असतात. त्याशिवाय सूर्यप्रकाशात वाळवलेली द्राक्षे अर्थात मनुक्यांमध्ये अँण्टीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते.

(हेही वाचा –Israel-Palestine Conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इस्त्रायलमध्ये दाखल, युद्ध सुरू असतानाच केला दौरा )

– रोज मूठभर सुकामेवा खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. मनुकांमुळे शरीरात GLP -1 नावाचे हार्मोन्स वाढवतात; जे स्वादुपिंडावर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे ठराविक प्रमाणात मनुका खाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

– मूठभर बदाम खाल्ल्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. खजुरामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून वजनावरही नियंत्रण राहते.

-सुका मेवा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी किंवा वजनही वाढत नाही. सुक्या मेव्यामुळे झोप चांगली लागते. नियमित व्यायाम करणे आणि भरपूर पाणी पिणेही आवश्यक आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.