राज्यात उष्णतेची लाट; उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘हे’ करा, ‘हे’ करु नका, जाणून घ्या सविस्तर

फेब्रुवारी महिन्यातच नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सततच्या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणालाही हा इशारा जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. यादरम्यान, तापमान सामान्यपेक्षा 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याची सुरुवातच इतक्या लवकर झाल्याने परिणामदेखील गंभीर होणार असल्याचा अंदाज आहे. ज्यामुळे शेती, सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

( हेही वाचा: सावधान! ‘या’ कारणामुळे मोबाईल होऊ शकतो ब्लास्ट )

या वातावरणात नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी, ते जाणून घेऊया.

उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘हे’ करा

 • दिवसा सर्वात उष्णतेच्या वेळा विशेषत: दुपारी 12 ते 4 दरम्यान शक्यतो घरात राहा.
 • शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर द्रवपदार्थ, विशेषत: पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या.
 • शक्यतो हलक्या रंगाचे, सैल कपडे घाला. जेणेकरुन गरम होणार नाही.
 • सुर्याच्या हानीकारक किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा.
 • हलके जेवण घ्या. जड, मसालेदार तेलकट पदार्थ खाणे टाळा, यामुळे शरिरात उष्णता वाढते.
 • शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड शाॅवर खाली आंघोळ करा किंवा आंघोळीसाठी थंड पाणी वापरा.
 • घर किंवा ऑफिस थंड ठेवण्यासाठी पंखा, कुलर किंवा एसीचा वापर करा.
 • दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्यापूर्वी डोक्यावर टोपी किंवा स्कार्फचा वापर करा किंवा सावलीसाठी छत्री घ्या.

‘हे’ करु नका

 • अल्कोहोल किंवा कॅफिनयुक्त पेय पिऊ नका, यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
 • दिवसा सर्वात उष्ण भागांमध्ये शारिरिक कसरती करु नका.
 • लहान मुले, वृद्ध किंवा पाळीव प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनांमध्ये बसण्यास जाऊ देऊ नका.
 • थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ नका.
 • थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखीसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.
 • धुम्रपान करु नका किंवा तंबाखूजन्य पदार्थ वापरु नका, यामुळे उष्णतेशी संबंधीत आजारांचा धोका वाढतो.
 • योग्यपद्धतीने न साठवलेले आणि जास्त दिवस झालेले अन्नपदार्थ, पेय घेऊ नका.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here