जगभरात दर ३० सेकंदात हेपेटाइटिसग्रस्त रुग्णांचा मृत्यू होतो. हेपेटाइटिस हा कधीही न बरा होणारा आजार आहे. यकृताला सूज आल्यास हेपेटाइटिसचे निदान होते. वाढत्या हेपेटाइटिसच्या रुग्णांमुळे जागतिक पातळीवर हेपेटाइटिसबाबत जनजागृती करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने घेतला. दरवर्षाला २८ जुलै निमित्ताने हेपेटाइटिस दिनानिमित्ताने जनजागृतीसाठी वेगवेगळ्या संकल्पना निवडल्या जातात.
यंदाच्या वर्षाची संकल्पना
‘एक जीवन, एक यकृत’ ही यंदाच्या वर्षाची संकल्पना आहे. जागतिक हेपेटाइटिस दिन व्हायरल हेपेटाइटिस आणि प्रतिबंध, चाचणी आणि उपचारांची गरज याबद्दल जागरूकता वाढवतो. हेपेटाइटिसग्रस्त रुग्णांना दिलासा देणे, आजाराबाबत निदान, चाचणी आणि उपचारांची माहिती देणे हे जागतिक हेपेटाइटिस दिनाचे उद्दिष्ट आहे. मोहिमा, परिसंवाद आणि व्याख्यानांच्या माध्यमातून डॉक्टर्स आणि आरोग्य कार्यकर्ते लोकांना रोगाबद्दल शिक्षित करतात.
(हेही वाचा – Monsoon Diseases : पावसाळी आजारांचा प्रतिबंध करण्याचे व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय)
जागतिक हेपेटायटीस दिनाचा इतिहास
अगोदर १९ मे रोजी जागतिक हेपेटाइटिस दिन साजरा केला जायचा. हेपेटाइटिसबाबत महत्वाचे संशोधन करणाऱ्या डॉ. बारुच ब्लुमबर्ग यांच्या वाढदिवसानिमित्ताने २८ जुलै हा दिवस जागतिक हेपेटाइटिस दिवस म्हणून पाळला जातो. डॉ. बारुच ब्लुमबर्ग यांनी हेपेटाइटिस बी विषाणूचा शोध घेऊन हेपेटाइटिस संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community