SBI बॅंकेने ग्राहकांना दिल्या या ५ टिप्स! लहानशी चूकही करू शकते तुमचे बॅंक खाते रिकामे, जाणून घ्या…

160

डिजिटल बॅंकिंगमुळे ग्राहकांना बॅंकेशी संबंधित सर्व कामे घरबसल्या करणे अगदी सहज शक्य झाले आहे. डिजिटल बॅंकिंग सुरक्षित करण्यासाठी देशातील बॅंका ग्राहकांना विविध टिप्स देत असतात. देशातील सर्वात मोठी बॅंक SBI ने सुद्धा ग्राहकांना डिजिटल बॅंकिंग संदर्भात काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत. याविषयी आपण जाणून घेऊया…

( हेही वाचा : MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १०८५ जागांसाठी भरती)

प्रिय ग्राहक तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात असे सूचित करत SBI ने ग्राहकांना सावध केले आहे.

SBI ने कोणत्या टिप्स दिल्या आहेत…

  1. ई-मेल/SMS वर आलेल्या कोणत्याही अज्ञात लिंक किंवा Attachment वर क्लिक करू नका.
  2. SBI बॅंक तुमची संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी कधीही लिंक पाठवत नाही.
  3. तुमचा Bank OTP, पासवर्ड, कार्ड क्रमांक कोणालाही शेअर करू नका.
  4. बक्षिसे, लॉटरीच्या मोहात न पडता अशा लिंकवर क्लिक करू नका. तुमची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा सायबर गुन्हेगारांचा हा प्रयत्न असू शकतो.
  5. तुमचे पासवर्ड वारंवार बदला.

SBI ने आपल्या सूचनापत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, ग्राहकांनी ईमेल, अज्ञात लिंक पासून दूर राहणे आवश्यक आहे. या चूका केल्यास तुमचे बॅंक खाते सायबर गुन्हेगार रिकामी करू शकतात असा इशाराही SBI ने दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.