काय सांगता? या हिल स्टेशनच्या नावात आहेत ८५ अक्षरे! नाव उच्चारणे, वाचणेही कठीण

121

प्रत्येक व्यक्तीची, देशाची किंवा शहराची ओळख ही त्याच्या नावावरून होत असते. आपण जेव्हा बाहेर प्रवास करतो तेव्हा अपरिचित किंवा अनोळखी नावं ऐकून आपण आश्चर्य व्यक्त करतो. अलिकडे नवजात बालकाचे सुद्धा युनिक नाव ठेवण्याचा पालकांचा कल असतो. ट्रेनने प्रवास करताना सुद्धा तुम्हाला वेगवेगळी नावं दिसत असतील बऱ्याचदा आपण असाही विचार करतो अशी नावे कोण ठेवत असेल?

( हेही वाचा : Aadhaar – Pan linking : आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी १००० रुपये पेनल्टी! कसा व कुठे भराल दंड)

आपण आता अशाच एका स्टेशनचे नाव जाणून घेणार आहोत हे नाव ऐकून तुम्ही सुद्धा विचार कराल हे कसे नाव आहे एवढंच काय तुम्हाला या नावाचा उच्चार करणे किंवा हे नाव वाचणेही अवघड जाणार आहे.

या हिल स्टेशनच्या नावात जवळपास ८५ अक्षरे आहेत ( 85 letters the name)

Taumatawhakatangihangakoauauotamateaturipukakapikimaungahoronukupokaiwhenuakitanatahu

New Project 8 2

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद

या हिल स्टेशनचे नाव आपल्याला वाचणे, उच्चारणे सुद्धा कठीण आहे. हे न्यूझीलंडमधील उत्तर आयर्लंड येथील एका रेल्वे स्थानकाचे नाव आहे. हे नाव उच्चारण्यास कठीण असल्यामुळे स्थानिक लोक या हिल स्टेशनला टोमॅटो हिल असे म्हणतात.

आता तुम्ही विचार करत असाल की एवढे मोठे नाव ठेवण्यामागे काय विचार आहे. एका शूर सैनिकाच्या नावावरून हे नाव देण्यात आल्याचे सांगितले जाते. या स्थानकाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.