-
ऋजुता लुकतुके
जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर भारतीय शेअर बाजारातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. व्यापारी युद्धाच्या भीतीमुळे निर्देशांकांची मोठी पडझड झाली आहे. पण, यात एक शेअर हा इतरांच्या तुलनेनं चांगली कामगिरी करताना दिसत आहे. हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स या केमिकल क्षेत्रातील कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या पडझडीनंतर चांगला परतावा दिला आहे. म्हटलं तर हा शेअर मागच्या ६ महिन्यांत ३२ टक्क्यांची घसरण सहन करून शेअर बाजारात उभा आहे. ६६८ रुपये मूल्यापासून तो थेट ४४० रुपयांवर आला आहे. पण, अलीकडच्या काळात ही पडझड थांबून मार्च महिन्यात सकारात्मक चित्र दिसू लागलं आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर १३ अंशांनी वर चढून ४४० वर बंद झाला. एका आठवड्यात यात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणूनच घसरणीचा काळ मागे सरून आता हिरव्या रंगाकडे शेअरने वाटचाल सुरू केली आहे, का हा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. (Himadri Share Price)
(हेही वाचा – Child Mortality: बालमृत्यूंबाबत सरकारी पोर्टलवर माहितीची लपवाछपवी; एप्रिल २०२४ नंतरची माहितीच उपलब्ध नाही)
हिमांद्री स्पेशालिटी केमिकल्सने डिसेंबर २०२४ ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जानेवारीत जाहीर केले. कंपनीने या तिमाहीत ३०.५५ टक्यांची नफ्यातील वाढ नोंदवली आहे. कंपनीचा तिमाहीतील नफा हा १४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर महसूलाही ८.३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीची एकूण विक्रीही ८ टक्क्यांनी वाढून ११४० कोटी रुपयांवर गेली आहे. कंपनीचं भागभांडवल २१.७ कोटी रुपयांचं आहे. तर प्रॉफिट अर्निंग गुणोत्तर ४२ इतकं तगडं आहे. कंपनीचा ५२ आठवड्यातील उच्चांक ६८८.७० इतका आहे. तर ५२ आठवड्यातील नीच्चांक २९५ इतका आहे. (Himadri Share Price)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमधील खरेदी – विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community