- ऋजुता लुकतुके
हिंन्दाल्को ही आदित्य बिर्ला समुहाची देशातील एक अग्रगण्य धातू उत्पादक कंपनी आहे. मागच्या काही दिवसांत धातू उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना शेअर बाजारात चांगले दिवस आहेत. त्याचा चांगलाच फायदा हिंदाल्कोला मिळाला आहे. शेवटचे दोन दिवस भारतीय शेअर बाजार जवळ जवळ ५ टक्क्यांनी घसरले असताना हिंदाल्कोचा शेअर मात्र सलग चार दिवस हिरव्या रंगात बंद झाला आहे. हिंदाल्कोही तांबे आणि ॲल्युमिनिअम उत्पादनात देशात आघाडीवर आहे. तर ॲल्युमिनिअमच्या बाबतीत चीनच्या मागोमाग याच कंपनीचा आशियात पहिला नंबर लागतो. (Hindalco Industries)
आणि धातूचे भाव सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चढे असल्यामुळे त्याचा फायदा हिंदाल्को कंपनीला मिळत आहे. त्यामुळे शुक्रवारी देखील हिंदाल्को कंपनीचा भाव एरवी बाजारात घसरण असताना सकारात्मक होता. शुक्रवारीही शेअरमध्ये ०.८० अंशांची वाढ होऊन हा शेअर ७४७.८० वर बंद झाला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. (Hindalco Industries)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : दहिसरमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, पण भाजपा चौधरींना कायम ठेवते की बदलते?)
वर सांगितल्या प्रमाणे ॲल्युमिनिअम हे कंपनीचं प्रमुख उत्पादन आहे. भाग भांडवल १.६९ लाख कोटी रुपये इतकं आहे. कंपनीचे १० देशांमध्ये एकूण ५२ उत्पादन प्रकल्प आहेत. तर भारतात २० प्रकल्प उभे आहेत. देशातील एकूण २३ खाणी हिंदाल्कोच्या मालकीच्या आहेत. कंपनीत एकूण ६८,५०० कर्मचारी कामाला आहेत. (Hindalco Industries)
ॲल्युमिनिअम आणि ॲल्युमिनिअमची रोल्ड उत्पादनं तयार करणं हे कंपनीचं मुख्य काम आहे. त्याबरोबरच कंपनी ॲल्युमिनिअम फॉईलही बनवते. त्याचबरोबर तांब्याचे कॅथोड बनवणं हे ही कंपनीचं आणखी एक उत्पादन आहे. कंपनीच्या काही खाणींमधून सोनं आणि चांदीही निघते. (Hindalco Industries)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community