- ऋजुता लुकतुके
हिंदाल्को ही आदित्य बिर्ला समुहातील आघाडीची पोलाद आणि धातू कंपनी आहे. पण, मागच्या चार दिवसांत कंपनीचा शेअर तब्बल साडेचार टक्क्यांनी खाली आला आहे. ही पडझड हिंदाल्कोची अमेरिकेतील उपकंपनी नोवेलिसच्या तिमाही निकालांमधील खराब कामगिरीनंतर झाली आहे. गुरुवारी नोवेलिसने अमेरिकन शेअर बाजारात आपला तिमाही निकाल सादर केला आणि यात कंपनीची सप्टेंबर तिमाहीतील एकूण मिळकत १८ टक्क्यांनी कमी झाल्याचं समोर आलं. तेव्हापासून शेअरमध्ये घसरण सुरू आहे. (Hindalco Share Price)
शुक्रवारी शेअर थोडाफार सावरून ६४८ अंशांवर बंद झाला. शुक्रवारी झालेली वाढ मामुली म्हणजे ०.८० अंशांची होती. नोवेलिस ही समुहातील सगळ्यात मोठी ॲल्युमिनिअम उत्पादक कंपनी आहे आणि कंपनीचं ॲल्युमिनिअल उत्पादनही सप्टेंबर तिमाहीत घटलं आहे. त्याचा परिणाम हिन्दाल्को कंपनीच्या शेअरवर झाला आहे. (Hindalco Share Price)
(हेही वाचा – Respiratory Disorders : २०१९ ते २०२२ मध्ये श्वसनविकारांमुळे मुंबईत ३३,७११ जणांचा मृत्यू)
सध्या भारतातही धातू कंपन्यांवर विक्रीचा दबाव आहे. हिंदाल्को बरोबरच टाटा स्टील, एनएमडीसी सारख्या कंपन्यांमध्येही घसरण दिसून येत आहे. त्यातच हिंदाल्को कंपनीचं रेटिंग संशोधन आणि ब्रोकरेज कंपन्यांनी नजिकच्या कालावधीसाठी कमी केलं आहे. एमके ग्लोबल कंपनीने हिन्दाल्कोवर शेअर कमी करा, हे रेटिंग बदलून ते विका असं केलं आहे. आताच्या किमतीपेक्षा शेअरमध्ये १८ टक्क्यांची घसरण होऊ शकते, असा संस्थेचा अंदाज आहे. (Hindalco Share Price)
नोवेलिस कंपनीने फक्त उत्पन्नातील घटच नाही नोंदवलेली तर कंपनीवरील कर्जही वाढलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये हिंन्दाल्कोचा शेअरवर दबावाखाली असण्याची शक्यता आहे. (Hindalco Share Price)
(शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमधील गुंतवणुकीवर सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community