Hinduja Brothers Net Worth : हिंदुजा बंधूंनी असा केला आपल्या साम्राज्याचा विस्तार

Hinduja Brothers Net Worth : हिंदुजा कुटुंबाची एकूण मालमत्ता ३२ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. 

47
Hinduja Brothers Net Worth : हिंदुजा बंधूंनी असा केला आपल्या साम्राज्याचा विस्तार
  • ऋजुता लुकतुके

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जी उद्योजकांची घराणी देशात उद्योगधंदे उभारत होती आणि भारताच्या पुढील विकासाची पायाभरणी करत होती, त्यामध्ये हिंदुजा कुटुंबाचं नाव घ्यावं लागेल. तेव्हाच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतात लहानाचे मोठे झालेले प्रेमचंद हिंदुजा यांनी १९१४ मध्ये शिखरपूरमधून (आता पाकिस्तानात) आपला उद्योग सुरू केला. तेव्हाच्या उद्योगाचं स्वरुप हे भारताला लागणाऱ्या वस्तू बाहेरून आयात करायच्या आणि भारतातून कापूर, तयार कापड, मसाले असे जिन्नस बाहेर पाठवायचे असाच होता. हिंदुजा यांनी इराणमध्ये आपल्या कंपनीचं मुख्यालय उभारलं आणि तिथूनच ते व्यवसाय करत होते. पायाभूत सुविधा उभारणीसाठी म्हणजे बांधकाम उद्योग आणि अवजड वाहन उभारणी हे त्यांचं लक्ष्य होतं.

प्रेमचंद आणि त्यांची तीन मुलं श्रीचंद, गोपीचंद आणि अशोक ही याच उद्योगात सुरुवातीपासून होती. तेव्हापासूनच त्यांना हिंदुजा बंधू असं नाव पडलं. पण, १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लाम राजवट आली आणि तिथून उद्योग करणं कठीण जाऊ लागलं. तेव्हा हिंदुजा बंधूंनी आपला उद्योग युरोपमध्ये नेला. लंडन आणि जिनिव्हा हे त्यांच्यासाठी मुख्य क्षेत्र बनलं. गोपीचंद आणि श्रीचंद १९७९ मध्येच लंडनला स्थलांतरित झाले. त्यांनी युकेचं नागरिकत्वही घेतलं. तर धाकटा भाऊ प्रकाश जिनिव्हा येथील उद्योग सांभाळत होता. चौथा भाऊ अशोक भारतातील व्यवसाय सांभाळतो. (Hinduja Brothers Net Worth)

(हेही वाचा – मुंबई महापालिकेत Facial Biometric Attendance ची सक्ती, पण मुख्यालयातच मशिन्सअभावी बोंबाबोंब)

या सगळ्या भावांनी मिळून अवजड वाहनं, तेल, विशेष रसायनं, सायबर सुरक्षा, आरोग्य व फार्मा, ट्रेडिंग, पायाभूत सुविधा उभारणी, मीडिया व मनोरंजन तसंच ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्र अशा क्षेत्रांत समुहाचा विस्तार केला आहे.

२०२४ मध्ये फोर्ब्सच्या यादीप्रमाणे हिंदुजा बंधूची एकूण मालमत्ता ३२ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे आणि भारतातील ते अकराव्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंबं आहे. १९८० साली वडील प्रेमचंद यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीचंद यांनी ब्रिटिश लेलँड कंपनी अधिग्रहित करून तिचं नामकरण अशोक लेलँड असं केलं. तसंच शेवरॉनकडून त्यांनी गल्फ ऑईल कंपनीही विकत घेतली. त्यानंतर हिंदुजा समुहाने भारत, युके आणि स्वीत्झर्लंडमध्ये बँका स्थापन करून मोठं नाव मिळवलं. तेव्हाच हे कुटुंब उद्योजक कुटुंबं म्हणून जगात नावारुपाला आलं. (Hinduja Brothers Net Worth)

(हेही वाचा – Transfer : १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; मिलिंद म्हैसकर बदली यांची वन विभागात बदली)

तिथून पुढे या कुटुंबाचा इतर व्यवसायांमध्ये विस्तार होत गेला. अशोक लेलँड ही समुहाची मुख्य कंपनी आहे. त्याव्यतिरिक्त स्विच मॉबिलिटी, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल साखळी, इंडसइंड बँक, गल्फ ऑईल इंटरनॅशनल अशा महत्त्वाच्या कंपन्या समुहात आहेत.

हिंदुजा बंधूंच्या भोवती अनेक वादही निर्माण झाले आहेत. १९८६ च्या बोफोर्स प्रकरणात हिंदुजा कुटुंबातील ३ भावांचा समावेश होता. भारत सरकारने १.३ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीच्या ४०० एविट्झर तोफा विकत घेण्याचा घाट घातला होता आणि याच तोफा विकत घ्याव्यात यासाठी हिंदुजा बंधूंनी सरकारी मंत्री आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. २००५ मध्ये याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि हिंदुजा बंधू निर्दोष सुटले. (Hinduja Brothers Net Worth)

(हेही वाचा – राष्ट्रवादीला झटका; Beed जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाणार?)

युकेचं नागरिकत्व मिळवण्यासाठीही गोपीचंद आणि श्रीचंद या भावांनी तिथल्या सरकारला लाच दिल्याचा आरोप अनेकदा त्यांच्यावर झाला आणि त्यामुळे युके तत्कालिक मंत्र्यांना राजीनामाही द्यावा लागला आहे. तर अगदी अलीकडे जिनिव्हातील भाऊ प्रकाश हिंदुजा आणि त्यांच्या कुटुंबियांवर नोकर वर्गाचा छळ केल्याचा आरोप झाला होता. अत्यंत अल्प पगारात त्यांना १५ तास राबवून घेतल्याचा खटला तिथल्या न्यायालयात चालला आणि त्यासाठी प्रकाश त्यांची पत्नी कमल, मुलगा अजय आणि सून नम्रता यांना साडेचार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. (Hinduja Brothers Net Worth)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.