दैनंदिन आयुष्यात वापरला जाणारा Cotton Swab कसा तयार झाला, जाणून घ्या इतिहास!

आपल्या रोजच्या दैनंदिन वापरात आपण काॅटन स्वॅबचा सर्रास वापर करत असतो. घरात कान साफ करण्यासाठी तसेच महिला मेकअप करण्यासाठी काॅटन स्वॅबचा वापर करतात. पण, सतत आपल्या वापरात असणा-या या काॅटन स्वॅबची निर्मीती कशी झाली? काॅटन स्वॅब बनवण्याची कल्पना कशी सूचली? त्याचा इतिहास काय? ते आपण जाणून घेऊया. काॅटन स्वॅबचा वापर घरापासून ते अगदी हाॅस्पिटल लॅब आणि मेडिकल लॅबमध्ये याचा वापर केला जातो. तसेच, सामान्य दिसणारा हा काॅटन स्वॅब गुन्हेगारासाठीही फाॅरेन्सिक तज्ज्ञांची मदत करतो. या काॅटन स्वॅबच्या माध्यमातून संशयीत व्यक्तीचा डीएनए सॅम्पल घेतला जातो.

कॉटन स्वॅबचा इतिहास

कॉटन स्वॅबचा आविष्कार  करणाऱ्या व्यक्तीचं नाव Leo Gerstenzang सांगितलं जातं. १९२० च्या दशकात पहिला कॉटन स्वॅब तयार करण्यात आला होता. याच्या आविष्काराला एक छोटीशी घटना कारण आहे. असं मानलं जातं की, एकदा लियो त्याच्या पत्नीला माचीसच्या काडीवर रूई लावून मुलांचा कान साफ करताना पाहिलं होतं. हे पाहूनच त्याला कॉटनस्वॅब तयार करण्याची कल्पना सुचली. यानंतर त्याने कॉटन स्वॅबचं उत्पादन तयार केलं. त्यांनी या कंपनीला Leo Gerstenzang Infant Novelty Company असं नावंही दिलं होतं. नंतर याचं नाव Q-Tips करण्यात आलं. तेव्हापासूनच याची मागणी वाढली.

( हेही वाचा: स्थायी समिती अध्यक्ष असे का वागतात?)

वेगवेगळ्या स्वॅबचा वापर केला जातो

गरजेनुसार वेगवेगळ्या कामांमध्ये कॉटन स्वॅबचा वापर केला जातो. तेच कोविडच्या टेस्टसाठी वापरला जाणारा आणि कान साफ करण्यासाठी वापरला जाणारा स्वॅब वेगळा असतो. कोविड टेस्टिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वॅबला Nasopharyngeal Swab म्हटलं जातं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here