पाणीपुरी हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ आहे. मुंबईत आपण जागोजागी पाणीपुरीची दुकाने पाहतो. पाणीपुरी ही इतर पदार्थांपेक्षा थोडी वेगळी असते ती माणसाच्या आवडीनुसार बदलते. म्हणूनच आपण पाणी-पुरीच्या दुकानावर गेल्यावर पाणीपुरी तिख्खा- मीठा, मिडियम चाहिए अशी मागणी करतो. चौपाटीवर तर लोक सर्रास पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेताना आपल्याला पहायला मिळतात. पण कधी विचार केलाय सर्वाच्या फेव्हरेट पाणीपुरीचा जन्म कधी झाला असेल?
( हेही वाचा : सरकारी नोकरीची मोठी संधी! २०६५ रिक्त पदांसाठी भरती )
पाणीपुरीची सुरूवात?
मध्ययुगीन कालखंडात मगध नावाचे राज्य होते. या राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. या मगध राज्यातील एका व्यक्तीने आपल्या राज्याला काही तरी वेगळं देण्यासाठी ‘फुलकी’ या नावाने एक पदार्थ केला. मगध राज्याचा अभ्यास केलेल्या ग्रीस इतिहासकार मगस्थेनेस च्या पुस्तकात आपल्याला चितबा, पिथथो, तीलबा, फुलकी या काही लोकप्रिय पदार्थांचा उल्लेख आढळतो.
परंतु काही संदर्भामध्ये पाणीपुरीचा जन्म महाभारतातल्या हस्तिनापुरात झाला असाही उल्लेख आढळला आहे. महाभारतात द्रौपदीचं जेव्हा पांडवांसोबत लग्न झाले, तेव्हा कुंतीने द्रौपदीची स्वयंपाक घरात परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यावेळी कुंतीने द्रौपदीला फक्त बटाटे आणि गव्हाचे पीठ दिले आणि त्यापासून काहीतरी वेगळं तयार करण्यास सांगितले तेव्हा नववधूने पुऱ्या केल्या, बटाटे उकडले आणि पाणी असे जेवण बनवले. यानंतर हा पदार्थ हस्तिनापुरातील लोक सुद्धा करू लागले. कालांतराने यात बदल होऊन पाण्याची जागा चिंचेच्या पाण्याने घेतली, खमंग आवडणाऱ्या लोकांना त्यात तिखट पाण्याची भर घातली आणि अशाप्रकारे हा रुचकर पदार्थ तयार झाला असे उत्तर भारतात मानले जाते.
पाणीपुरीचे स्वरूप
पाणीपुरी हा पदार्थ आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. उत्तर भारतात गोलगप्पा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पाणीपुरीला ‘गुपचूप’, ‘पानी के पताशे’, ‘फुलकी’ या नावानेही ओळखले जाते. मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये पाणीपुरीला टिक्की या नावाने ओळखले जाते, महाराष्ट्रात गरम रगड्यामध्ये पाणी पुरी दिली जाते. तर गुजरातमध्ये मुगाच्या डाळीचं वरण हे पुरीमध्ये दिले जाते. कर्नाटकात पाणीपुरी खाताना कांदा चिरून आधीच पुरीमध्ये दिला जातो. पाणीपुरी कोणत्याही स्वरूपात असो ती कायम भारतीयांची फेव्हरेट राहणार आहे.
Join Our WhatsApp Community