History of Muhurat Trading : भारतात मूहूर्ताचं ट्रेडिंग कधी सुरू झालं? काय आहे त्याचा इतिहास 

History of Muhurat Trading : मुंबई शेअर बाजारात मूहूर्त ट्रेडिंग अधिकृतपणे आधी सुरू झालं

26
History of Muhurat Trading : भारतात मूहूर्ताचं ट्रेडिंग कधी सुरू झालं? काय आहे त्याचा इतिहास 
History of Muhurat Trading : भारतात मूहूर्ताचं ट्रेडिंग कधी सुरू झालं? काय आहे त्याचा इतिहास 
  • ऋजुता लुकतुके

राष्ट्रीय शेअर बाजार, मुंबई शेअर बाजार यांच्यासह देशातील इतर सर्व महत्त्वाच्या शेअर बाजारांमध्ये मूहूर्ताचे सौदे किंवा ट्रेडिंग ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. हिंदू रितीप्रमाणे दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवं आर्थिक वर्ष सुरू होतं. आणि त्या निमित्ताने व्यापारी लोक पुढील वर्षी आपल्या धंद्याला बरकत यावी यासाठी आपल्या हिशोबाच्या वह्या, साधनं आणि इतर गोष्टींची पूजा करतात. प्रामुख्याने लक्ष्मीची आराधना करतात. मग नवीन व्यवहारांना सुरुवात करतात. (History of Muhurat Trading)

(हेही वाचा- Divorce News: सहमतीने घटस्फोट घेणाऱ्यांसाठी हायकोर्टाने कौटुंबिक न्यायालयांना दिल्या महत्त्वाच्या सूचना)

व्यापारी समुदायामध्ये ही पंरपरा अगदी सुरुवातीपासून आहे. दिवाळीचा सण आणि लक्ष्मीपूजन समारंभात देशातील धार्मिक, आर्थिक, अध्यात्मिक असे सगळे रंग एकत्र आले आहेत. पूर्वी मुंबई शेअर बाजाराचं स्वरुपही अनौपचारिक होतं. आणि अक्षरश: मुंबईत एका झाडाखाली हे सौदे सुरू झाले होते. तेव्हाही लक्ष्मीपूजनाची परंपराही होतीच. पण, त्याला अधिकृत स्वरुप आलं नव्हतं. मुंबईच्या व्यापारी वर्तुळातील एक खूप लहान समुदाय एकत्र येऊन मूहूर्ताचे सौदे करायचा.  (History of Muhurat Trading)

पण, मुंबई शेअर बाजाराने त्याला अधिकृत स्वरुप दिलं ते १९९० च्या दशकात. त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजारानेही एक तासाचं अधिकृत सत्र सुरू केलं. या कालावधीत केलेली गुंतवणूक लाभदायी ठरते असा गुंतवणूकदारांचा विश्वास असतो. त्यामुळे सौद्यांचं प्रमाण आणि आकारही लहान असतो. पण, त्यात सकारात्मकता असते. (History of Muhurat Trading)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात “या” विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवारी अर्ज)

यंदा १ नोव्हेंबरला मूहूर्ताचं ट्रेडिंग होणार आहे. संध्याकाळी ६ ते ७ या कालावधीत मूहूर्ताचं ट्रेडिंग पार पडणार आहे. आणि त्यापूर्वी १५ मिनिटांचं प्रीट्रेडिंग सत्र नेहमीप्रमाणे पार पडेल. टी प्लस वन सेटलमेंट असल्यामुळे त्या दिवशी झालेले व्यवहार पुढील दिवशीच पूर्ण होतील. (History of Muhurat Trading)

राष्ट्रीय व मुंबई शेअर बाजारातील मूहूर्त ट्रेडिंगच्या वेळा 

१ नोव्हेंबरचं विशेष ट्रेडिंग सत्र

सुरुवातीची वेळ

समाप्तीची वेळ

प्री-ट्रेडिंग सत्र

१७.४५

१८.००

प्रत्यक्ष मूहूर्त ट्रेडिंग

१८.००

१९.००

समाप्तीचं सत्र

१९.००

१९.३०

ब्लॉक डील सत्र

१७.३०

१७.४५

सौद्यांमध्ये बदल करण्याची वेळ

१८.००

१९.३०

 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.