धुळीवडच्या दिवशी विविध रंगांनी मनसोक्त खेळून झाल्यानंतर तो रंग काढायचा कसा? असा प्रश्न उभा राहतो. अशावेळी रंग कसा काढायचा त्याच्या सोप्या टीप्स जाणून घेऊया.
थंड पाणी वापरा
गरम पाण्याने अंघोळ केल्यावर सगळा रंग निघून जातो असा अनेकांचा गैरसमज असतो. पण उलट गरम पाण्याच्या वापरामुळे रंग अधिक घट्ट होऊन चिकटून बसतो. होळी खेळून आल्यावर सर्वप्रथम चेहरा गार पाण्याने धुवून घ्या. केस धुतानाही थंड पाण्याचा वापर करा.
( हेही वाचा: चंदेरी गडावर शिवरायांच्या ८५ किलो मूर्तीची केली स्थापना; शिवप्रेमींच्या भगीरथ प्रयत्नांना यश )
घरगुती फेसपॅक
पपईची पेस्ट, मध आणि मुलतानी माती एकत्र करुन एक फेसपॅक तयार करता येईल. समप्रमाणात लिंबाचा रस आणि मध चेह-याला लावणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. ख-या अर्थाने गुणकारी पॅक हवा असेल तर दही, बेसन, चण्याचे पीठ, हळद, ऑलिव्ह ऑइल या नैसर्गिक घटकांचा फेसपॅकमध्ये समावेश करा. ज्या जागचा रंग उठून दिसतोय तिथे ही पेस्ट लावा.
जंतुसंसर्गापासून सावधान
काही वेळेस रंग अगदी पटकन निघून जातो. पण नंतर रंगातील रसायनांमुळे खूप खाज येऊ लागते किंवा काही भागांत जंतुसंसर्ग होण्याचीही शक्यता असते म्हणून वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे. शरीराला चांगल्या प्रतीच्या अॅंटीसेप्टिक क्रिमने मसाज करा. चेह-याला गुलाबपाणी लावा आणि ते पूर्ण आतपर्यंत शोषले जाईल याची खात्री करुन घ्या.