Happy Holi : कुठे रॉयल…तर कुठे फुलांची; देशभरातील होळीचे विविध रंग!

होळी हा जगभरात प्रसिद्ध सण आहे त्यामुळे देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते.

मथुरा-वृंदावन

वृंदावनात फुलांनी होळी खेळतात. बांके बिहारी मंदिरात दार उघडताच मंदिराचे पुजारी भक्तांवर पुष्पवर्षा करतात. यानंतर इतर मंदिरांमध्ये या होळीचे आयोजन केले जाते.

( हेही वाचा : उध्दव ठाकरे यांना पुन्हा आठवले कार्यकर्ते, लग्नसोहळ्यातही लावली जाते उपस्थिती)

लठमार होळी

लठ म्हणजे काठीने खेळली जाणारी होळी. ही संस्कृती सुद्धा भारतात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक लोक इथे होळी खेळण्यासाठी येतात. या होळीच्या सणाला आठवडाभर आधी सुरूवात होते. काही भागात लाडू होळी सुद्धा खेळली जाते यावेळी उपस्थित लोक एकमेकांवर लाडू फेकतात.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये वसंत उत्सव या नावाने होळी साजरी केली जाते. शांतिनिकेतनमधील विश्व भारती युनिव्हर्सिटीमध्ये या होळीचे आयोजन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आनंदपूर साहिब

आनंदपूर साहिब पंजाब येथे पंजाबी संस्कृतीनुसार होळी खेळली जाते. १७०१ पासून येथे होळीची सुरूवात झाली. मार्शल आर्ट्स, तलवारबाजी असे साहसी खेळ यावेळी खेळले जातात.

उदयपूरची रॉयल होळी

होळीच्या पूर्वसंध्येला उदयपूरमध्ये विशेष होळी असते. याला शाही किंवा रॉयल होळी सुद्धा म्हणतात. यावेळी शाही पद्धतीने होळी साजरी करून मिरवणूक काढली जाते. घोडे, हत्ती, रॉयल बॅंडचा या मिरवणुकीत समावेश असतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here