मुंबईत धुळवडीसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त होळी साजरी करण्यात येणार आहे. मुंबईत सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक भागात सेलिब्रेटी, राजकीय नेते हजेरी लावणार आहेत.
( हेही वाचा : पुणेकरांची गैरसोय! PMPML बसगाड्या पुरवणाऱ्या कंत्राटदारांचा संप)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमांना हजेरी लावणार
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा अनेक ठिकाणी होळी, धुळवडीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. भाजपचे महत्त्वाचे नेते जुहू येथे धुळवड साजरी करणार असून यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, कृपाशंकर सिंह, मंगलप्रभात लोढा हे सर्वजण एकत्र येणार आहेत.
पोलीस यंत्रणा सज्ज
तसेच होळी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुद्धा विशेष खबरदारी घेतली असून सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात पोलीस तैनात असणार आहेच. ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे धुळवडीसाठी मुंबईत विशेष तयारी झाली असून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community