Health Tips: घसा खवखवतोय? तर घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील रामबाण उपाय

146

हवेचा दर्जा खराब झाल्याने मुंबईकरांची तब्येत बिघडत असल्याने सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. वृद्धांना रुग्णालयात भरती करुन उपचार घ्यावे लागत आहेत. हवेची गुणवत्ता खराब राहण्याचे प्रमाण हिवाळ्यांच्या दिवसांत सातत्याने दिसून येते. यासाठी घरातील केवळ तीन पदार्थांचे सेवन केल्यास सर्दी, खोकला तसेच घशाचे खवखवणे होणार नाही, असा दावा आयुर्वेदाचार्य करतात. कांदा, आलं आणि अळशीच्या मिश्रणातून तयार काढा रोज सकाळी अनावशी पोटी पिल्यास सर्दी, पडश्याच्या संसर्गापासून शरीराचा बचाव होतो. ताज्या बनवलेल्या काढ्याचे परिणाम लवकर दिसून येतात. त्यामुळे काढा फ्रिजमध्ये बनवून ठेवू नका, असा सल्लाही आयुर्वेदाचार्य देतात.

काढा तयार करण्याची पद्धत

कढईत दोन ग्लास पाणी घ्या. एक पांढरा कांदा, एक पूर्ण चमचा अळशी आणि दोन चमचे किसलेले आले उकळलेल्या पाण्यात टाका. धीम्या आचेवर काढा किमान ४५ मिनिटे उकळून घ्यावा. मग गॅस बंद केल्यानंतर काढा एका ग्लासमध्ये गाळून घ्यावा. त्यानंतर गरम काढ्याचे हळूहळू सेवन करावे.

काढा पिण्याची वेळ

सकाळी अनावशी पोटी काढा प्यायल्यास शरीरावर चांगले परिणाम दिसून येतात. सर्दी, खोकला तसेच घशाचे खवखवणे जास्त असेल तर दिवसांतून दोनदा काढा प्यायलेला उत्तम.

काढा पिण्याचे फायदे

  • अळशीचा गर घसा तसेच मंदावलेली श्वसनप्रक्रिया पूर्ववत करते. कित्येकदा घशात अडकलेला कफ तसेच नाकातील सुकी सर्दी अळशीच्या गराच्या सेवनाने मोकळी होते. परिणामी कफ आणि सर्दी बाहेर पडण्यास मदत होते.
  • कांदा तसेच आल्याचा रस हा शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतो. कित्येकदा सर्दी तसेच खोकल्याच्या त्रासापासून दूर राहण्यासाठीही या काढ्याचा सल्ला दिला जातो.
  • श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांनी दररोज काढ्याचे सेवन केल्यास प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.

(हेही वाचा – विद्यार्थ्यांनो, परीक्षाकाळात तणावमुक्त राहण्यासाठी करा ‘ही’ योगासने)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.