देशी टॅलेंट: या तरुणाने बनवली अशी बाईक ज्यासाठी इंधनाची नाही गरज

124

तुम्ही कौशल्य म्हणा किंवा जुगाड म्हणा, भारतीय याबाबतीत खूप पुढे आहेत. देशी जुगाड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर सामान्य भारतीयांनी बनवलेल्या अनेक गोष्टी उभ्या राहतात. सध्या सोशल मीडियाच्या युगात या प्रकारचं कौशल्य सर्वांसमोर येतं, ज्यास आपण देशी जुगाड म्हणतो.

hunter_bebak_kalam नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ४० लाखांपेक्षा अधिक व्यूज मिळाले असून हा व्हिडिओ प्रचंड गाजत आहे. या व्हिडिओतील एका तरुणाने लाकडापासून बुलेट बनवली आहे.

विशेष म्हणजे ही बुलेट अगदी खर्‍या बुलेटसारखी दिसते आणि चालवतानाही तसाच भास होतो. इतकंच काय तर फ्यूल टॅंक आणि सायलेन्सर देखील लाकडाचा आहे. हे अद्भूत कौशल्य पाहून सोशल मीडियावर या तरुणावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

ही अद्भूत बुलेट इथे पाहा:

https://www.instagram.com/reel/CpPaXnRhqDJ/?utm_source=ig_embed&ig_rid=f88dcc72-4f00-47d2-bde7-cdfe5fd985fe

हा व्हिडिओत एक तरुण बुलेटवर बसला आहे आणि पाहून आपल्याला शंका सुद्धा येत नाही की ज्या बुलेटवर तो बसला आहे, ती बुलेट लाकडाची असेल. बुलेट सुरु केल्यावर तंतोतंत खर्‍या बुलेटसारखाच आवाज येतो. विशेष म्हणजे ही बुलेट इंधनाशिवाय चालते, त्यामुळे खिशाला परवडणारी आहे.

चार्जेबल बॅटरीद्वारे ही बुलेट सहज धावते. गंमत म्हणजे फ्यूल टॅंकमध्ये म्युझिक सिस्टिम लावण्यात आली आहे. व्हिडिओ बनवणार्‍याने ही सर्व माहिती दिली आहे. आता ह अव्हिडिओ इतका व्हायरल होत आहे की कदाचित कुणीतरी या तरुणाला असीच बुलेट बनवण्याची ऑर्डर देऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.