-
ऋजुता लुकतुके
होंडा या दुचाकी कंपनीने आपल्या सीबी २००एक्स या दुचाकीचं नाव बदलून आता काही नवीन फिचर आणि डिझाईनसह एनएक्स२०० ही नवीन बाईक बाजारात आणली आहे. आधीच्या बाईकमध्ये त्यासाठी ५ मोठे बदल कंपनीने केले आहेत. बाईकची किंमत मात्र आधीइतकीच म्हणजे १.६७ लाख रुपयांच्या आसपास आहे. हे बदल आणि नवीन बाईकची वैशिष्ट्य समजून घेऊया, (Honda NX200 Bike)
नवीन डिझाईन – सीबी २०० एक्सच्या तुलनेत एनएक्स २०० चं डिझाईन तितकंसं बदलेलं नाही. गाडीचे एलईडी हेडलाईट आणि इंडिकेटर आधीसारखेच आहेत. बाईकचा टेललाईटही एक्स आकाराता एलईडी लाईट आहे. पण, गाडीतील काही फिचर आणि रंग बदलले आहेत. नवीन एनएक्स २०० बाईक ही ॲथलेटिक मेटॅलिक ब्लू, रॅडियंट रेड मेटालिक आणि पर्ल इग्निअस ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल. (Honda NX200 Bike)
इंजिन – नवीन गाडीचं इंजिन पूर्णपणे बदलेलं आहे. यात १८४.४६ सीसी क्षमतेचं एकच सिलिंडर असलेलं इंजिन आहे. यात ५ स्पीडचा गिअरबॉक्स असेल आणि गाडी घसरू नये यासाठी कंट्रोल देण्यात आला आहे. या इंजिनमधून १६.७६ अश्वशक्ती इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. (Honda NX200 Bike)
(हेही वाचा – दुकानांच्या वाढीव बांधकामांनीही अडवला पदपथ; BMC कारवाईची दाखवणार का हिंमत?)
Adventure Camp Lonavala didn’t just hit the redline—it went full throttle.
With the CRF450 Rally standing tall and the NX200 making its grand debut, the thrill was unstoppable. #HondaBigWing #BigBikes #Motorcycles #BigWingIndia #LonavalaAdventureCamp pic.twitter.com/QJ99ddeZA4
— Honda BigWing India (@BigWingIndia) February 17, 2025
हार्डवेअर – सीबी२०० एक्सच्या तुलनेत फारसं हार्डवेअरही बदललेलं नाही. या बाईकमध्ये हिऱ्याच्या आकाराच्या फ्रेममध्ये पुढचे फोर्क आणि मागचे मोनोशॉक बसवलेले आहेत. चालकाच्या संरक्षणासाठी एबीएस प्रणालीही यात बसवण्यात आली आहे. (Honda NX200 Bike)
डिजिटल डिस्प्ले – नवा टीएफटी डिस्प्ले हे एनएक्स २०० बाईकचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ४.२ इंचांचा हा डिस्प्ले आहे आणि यात फोन या यंत्रणेशी जोडल्यास अगदी तुम्हाला येणारे फोन कॉल आणि संदेशही दिसतील. तर ब्लूटूथ जोडणी झाल्यावर तुम्ही गाणीही इथं ऐकू शकाल आणि तुम्हाला गुगल मॅपची मदतही मिळू शकेल. (Honda NX200 Bike)
आधुनिक फिचर – या बाईकमध्ये युएसबी चार्जर जोडणीची सोय आहे. तसंच चालकाच्या सुरक्षिततेसाठी एबीएस ही अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे. वेगाबरोबरच रस्त्याच्या कडेला झोक गेल्यास ही यंत्रणा चालकाला सावध करेल. तसंच बाजूने कुठले वाहन जात असेल तरी तसा इशारा करेल. (Honda NX200 Bike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community