Hot Milk : रात्री गरम दूध पिणं शरीराला उपयुक्त आहे का ? वाचा आहारतज्ज्ञांचे म्हणणे…

दुधातील पोटॅशियममुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते

209
Hot Milk : रात्री गरम दूध पिणं शरीराला उपयुक्त आहे का ? वाचा आहारतज्ज्ञांचे म्हणणे...
Hot Milk : रात्री गरम दूध पिणं शरीराला उपयुक्त आहे का ? वाचा आहारतज्ज्ञांचे म्हणणे...

दुधात अनेक पौष्टिक घटकांचा समावेश असतो. प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडिन, जीवनसत्त्व अ, डी, के, ई यासह अनेक खनिजे, मेद आणि ऊर्जा या घटकांमुळे दुधाला पूर्णान्न समजले जाते. दूध (Hot Milk) सकाळी प्यावे की रात्री प्यावे, याविषयी बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम असतो. काहींना सकाळी , तर काही रात्री दूध प्यायला आवडते. बरेच जण रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध (Hot Milk) पितात, आहारतज्ज्ञांच्या मते खरंच रात्री दूध पिणे उपयु्क्त ठरतं का ? जाणून घेऊया –

दुधामुळे आरोग्य चांगलं राहतं. हाडांच्या मजबुतीसाठी, थकवा दूर होण्यासाठी, गाढ झोप लागण्यासाठी दुधाची मदत होते. दुधातील पोटॅशियममुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते. पोटंही बराच वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध पिणं उपयुक्त ठरतं. दुधात कॅल्शियम आणि प्रथिने असल्यामुळे त्यात असलेल्या शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. दुधातील कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. मन शांत राहून झोपही शांत मिळते.

(हेही वाचा-Chandrayaan Mission Scene : पुण्यातील भूगाव येथे गणेशोत्सवानिमित्त साकारला इकोफ्रेंडली चंद्रयान मोहीम देखावा)

दुधात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड असतं. त्यामुळे झोपेच्या हार्मोनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे डोकं शांत राहतं. झोप येण्यास मदत होते. रात्री झोपण्याच्या एक तास आधी गरम दूध प्यायल्यास झोप चांगली लागते. प्रकृतीप्रमाणे प्रत्येक व्यक्तिने कधी दूध प्यावे, हे आपले आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी चर्चा करून ठरवावे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.