Hotel Management Salary : हॉटेल मॅनेजमेंट पदवीवर तुम्ही महिन्याला किती पगार कमावू शकता?

Hotel Management Salary : हॉटेल व्यवसायातील सरासरी पगार आणि कामाचं स्वरुप.

35
Hotel Management Salary : हॉटेल मॅनेजमेंट पदवीवर तुम्ही महिन्याला किती पगार कमावू शकता?
  • ऋजुता लुकतुके

हॉटेल मॅनेजमेंट ही सेवा क्षेत्रातील नोकरी आहे. त्यामुळे तुमचा थेट लोकांशी संबंध येतो आणि त्यामुळे तुमचं आदरातिथ्य, आदबशीर वागणं तसंच चांगलं व्यक्तिमत्त्व या गोष्टींचाही तुम्हाला या नोकरीत उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही मोठी फाईव्ह-स्टार हॉटेल किंवा क्रूझवर काम करू शकता. विमान कंपन्या किंवा मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातही या स्वरुपाच्या नोकऱ्या आहेत. (Hotel Management Salary)

(हेही वाचा – BMC : विक्रोळी पोलिस ठाण्याला महापालिकेने दिला हात, अखेर पोलिस ठाण्यासाठी पर्यायी जागा मिळाली)

तुम्ही मिळवलेली पदवी, तुमचा अनुभव आणि वर म्हटल्याप्रमाणे नोकरीसाठी लागणारी कौशल्य यावर तुम्हाला मिळणारा पगार अवलंबून असतो. पण, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अननुभवी व्यक्तीला भारतात सरासरी वार्षिक ७ लाख रुपये इतका पगार मिळतो. तर अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर हा पगार वार्षिक १८ लाख रुपये सरासरी इतका वाढू शकतो. (Hotel Management Salary)

(हेही वाचा – Vicky Jain Net Worth : मुंबईत ८ खोल्यांचा फ्लॅट, आलिशान गाड्यांचा ताफा, विकी कौशलची मालमत्ता एकूण किती आहे?)

अन्नपदार्थ व पेयं बनवणे, त्यासाठी मदत करणे पासून ते अकाऊंटिंग, विविध काऊंटर सांभाळणे, आर्थिक हिशोब सांभाळणे तसंच हॉटेल आणि विमानतळांवर देखभालीची काम असं या कामाचं स्वरुप असू शकतं. आता व्यवस्थापक पदावरील म्हणजे जबाबदारीची कामं करणाऱ्या व्यक्तीला विविध प्रकारच्या कामांमध्ये सरासरी किती पगार भारतात मिळतो ते पाहूया, (Hotel Management Salary)

(हेही वाचा – Temple : १५० वर्षे जुने मंदिर पहारेकरी म्हणून आलेल्या वाजिद अलीने बळकावले, आधी मूर्ती चोरल्या… आता हिंदूंनी फडकवला भगवा ध्वज)

New Project 2024 12 21T194812.570

या क्षेत्रात हॉटेल व्यवस्थापक आणि रेस्टॉरंट व्यवस्थापक यांना साधारणपणे सर्वाधिक पगार मिळतो. त्यानंतर फ्रंट डेस्क आणि सगळ्यात कमी पगार हाऊसकीपिंगच्या लोकांना असतो. तर शेफना मिळणारा सरासरी वार्षिक पगार हा ९.५ लाख रुपये इतका आहे. (Hotel Management Salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.