hotel management salary : भारतात हॉटेल मॅनेजमेंट करणार्‍यांना किती मिळतो पगार?

113
hotel management salary : भारतात हॉटेल मॅनेजमेंट करणार्‍यांना किती मिळतो पगार?

भारतामध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी (hotel management salary) वार्षिक पगार रु. ३,००,००० ते रु. ५,००,००० या दरम्यान असतो. पण एखाद्या उमेदवाराकडे सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा कामाचा अनुभव असेल तर त्या त्याला वर्षाचा पगार साधारणपणे रु. १८,००,००० पर्यंत मिळू शकतो.

हॉटेल मॅनेजमेंटअंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसे की, सेल्स आणि मार्केटिंग, फूड आणि ज्यूस किंवा ड्रिंक्स, फ्रंट ऑफिस, अकाउंटिंग, अन्न तयार करणं, हाऊसकीपिंग इत्यादींमध्ये करिअर करण्याची मोठ्या प्रमाणात संधी मिळते. हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्राने पर्यटन व्यवसायातही आपला विस्तार वाढवला आहे. उदा. एअरलाइन कंपन्या, MNCs इत्यादी.

ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स, लेमन ट्री, लीला ग्रुप ऑफ हॉटेल्स, मॅरियट इंटरनॅशनल, हयात हॉटेल्स, आयटीसी ग्रुप ऑफ हॉटेल्स आणि द ओबेरॉय हॉटेल्स हे उत्तम पगाराच्या पॅकेजसह हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात नोकऱ्या देणारे टॉप रिक्रूटर्स आहेत.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकची सांगता; आता ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजलीसच्या हातात)

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सुरुवातीला मिळणारा वार्षिक पगार

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये (hotel management salary) सुरुवातीला साधारणपणे त्या त्या पदानुसार वर्षाला अडीच ते पाच लाख रुपये इतका पगार दिला जातो.

हॉटेल मॅनेजरचा सुरुवातीला पगार पावणे चार लाख रुपये असतो तर हाउसकीपिंग सुपरवायझरचा सुरुवातीला पगार वर्षाला तीन लाख रुपये इतका असतो.

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मिळणारा मासिक पगार

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केलेल्या व्यक्तीला महिन्याला साधारणपणे १७,३८२ रुपये ते १९,५२८ रुपये इतका असतो. जसजसा कामाचा अनुभव वाढतो तसतसे वरच्या पदावर प्रमोशन होतं आणि पगारही वाढतो.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : कांस्य विजेत्या हॉकी संघाचं अमृतसरमध्ये जोरदार स्वागत)

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मिळणारा सर्वाधिक पगार

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सर्वाधिक पगार वर्षाला पंधरा लाख रुपये ते पंचवीस लाख रुपयांच्या दरम्यान असतो.

मिशेलिन-स्टार किंवा ५ स्टार हॉटेल्स इतर हॉटेल चेनच्या तुलनेमध्ये खूप जास्त पगार देतात.

हॉटेल मॅनेजमेंटमधल्या पदानुसार पगार

हॉटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात वेगवेगळ्या पदाच्या नोकऱ्या असतात. हॉटेलमधला सर्वोच्च जॉब प्रोफाइल हा हॉटेल जनरल मॅनेजरचा असतो.

हॉटेल मॅनेजमेंटमधला अभ्यासक्रमानुसार पगार

हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातला पगार हा विद्यार्थ्याने केलेल्या कोर्सनुसार वेगवेगळा असतो. हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट आणि एमबीए इन हॉटेल मॅनेजमेंट हे लोकप्रिय हॉटेल मॅनेजमेंट कोर्स आहेत. हे कोर्स १२ वी पूर्ण केल्यानंतर करता येतात.

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट (hotel management salary) हा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला साधारणपणे वर्षाला दीड ते तीन लाख रुपये इतका पगार असतो. अनुभवानुसार हा पगार वाढत जातो.

(हेही वाचा – Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक पदकाचा रंग एका आठवड्यात उतरला! खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल?)

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला साधारणपणे वर्षाचा पगार अडीच लाखांपासून पुढे मिळतो. हा पगार विद्यार्थ्यांनी केलेल्या स्पेशलायझेशन कोर्स, त्यांचे स्किल्स, पात्रता, नोकरीचं ठिकाण, कामाचा अनुभव इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असतो. विद्यार्थी त्यांच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या इंटर्नशिपमध्ये काम करू शकतात. ज्यामुळे त्यांना चांगला अनुभव आणि त्यासोबतच चांगल्या प्लेसमेंट्सही मिळतात.

बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट

बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंट या कोर्समुळे फ्रेशर आणि अनुभवी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी मिळते. किचन मॅनेजमेंट, फास्ट फूड चेन, हॉस्पिटॅलिटी आणि इन्स्टिट्यूशनल केटरिंग, MNCs इत्यादींसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये बीएससी इन हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेले विद्यार्थी नोकरी करू शकतात. हॉटेल मॅनेजमेंटमधील (hotel management salary) बीएससीचा वार्षिक पगार साधारणपणे सव्वा सहा लाख इतका असतो.

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : बाप्पाच्या मिरवणुकीत लेझर-डीजेचे ‘विघ्नहरण’ होणार)

एमबीए इन हॉटेल मॅनेजमेंट

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांचा पगार हा त्यांच्या नोकरीच्या प्रोफाईलवर आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणावर अवलंबून असतो.

टॉप हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी फ्रेशर म्हणून सुरुवातीला वर्षाला ३.२० लाख रुपये एवढ्या पगाराची अपेक्षा करू शकतात. तर अनुभव असलेले विद्यार्थी वर्षाला ५.५० लाख रुपये एवढा पगार मिळवू शकतात. हा पगार विद्यार्थ्यांचा अनुभव, स्किल्स, कंपनी, नोकरीचं ठिकाण यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.

भारतात तसेच परदेशात अनेक नावाजलेल्या हॉटेल चेन्स आहेत, ज्या फ्रेशर्स आणि अनुभवी विद्यार्थ्यांना सर्वाधिक पगाराचे पॅकेज प्रदान करतात. हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्सना शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, एअरलाइन्स, पर्यटन विकास इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी मिळू शकते. (hotel management salary)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.