ऐका ‘पिझ्झा’च्या जन्माची कहाणी…

93

पिझ्झा या पदार्थाने भारतीय खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विशेषतः तरुण – तरुणींना पिझ्झाने वेड लावलं आहे. पार्टी असो, स्नेहमीलन असो किंवा कोणताही समारंभ असो तरुणांना पिझ्झा खायला खूप आवडतं. बरं पण तुम्हाला तुमच्या आवडत्या पिझ्झाची जन्म कथा ठाऊक आहे का? नाही ना? चला तर जाणून घेऊया.

आज प्रत्येक ठिकाणी पिझ्झा उपलब्ध असतो. अगदी गावाकडेही पिझ्झा मिळू लागला आहे. पिझ्झाची सुरुवात ग्रीकमध्ये झाली. हा पिझ्झा खरंतर सुमारे २००० वर्षे जुना आहे. मात्र आज आपण खातो तो पिझ्झा इटलीचा आहे. ग्रीकमध्ये पिझ्झाची उत्पत्ती झाली आणि इटलीतून प्रवास करत अमेरिकामार्गे पिझ्झा भारतात आला.

(हेही वाचा सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ टिपण्णीवर मनसेची भूमिका; हिंदूंना एक आणि मुसलमानांना एक न्याय)

ब्रेड, खजूर, वनस्पती यांच्या मिश्रणातून पहिल्यांदा पिझ्झा तयार झाला तो इटलीमध्ये. आज पिझ्झा महागडा मिळत असला तरी पूर्वी हा पदार्थ झटपट बनवता येत असल्यामुळे गरीबांचा पदार्थ म्हणून पिझ्झाची ओळख होती. इटलीमध्ये पहिल्यांदा नेपल्समधील रॉफेल एस्पिओसिटो यांनी या पदार्थाची निर्मिती केली.

राजा अम्बर्टो पहिला आणि राणी मार्गारिटा नेपल्सच्या दौर्‍यावर असताना रॉफेल यांनी राजा व राणीसाठी इटेलियन झेंड्याच्या रंगाचा पिझ्झा बनवून दिला. यात मोजरेला चीजचाही समावेश होता. हा पदार्थ राणीला खूप आवडला. १९९६ मध्ये पहिल्यांदा पिझ्झा बनवण्यात आला. पिझ्झा हट या कंपनीने बंगळुरु शहरात आपले पहिले आऊटलेट सुरु केले. त्यानंतर पिझ्झा हा भारताचा होऊन बसला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.