नवजात बालकाला मातांनी स्तनपान करण्याची पद्धत जाणून घ्या

how breastfeed their newborn baby

नुकतेच प्रसूती झालेल्या मातेला आपल्या बाळाला स्तनपान कसे करावे, बाळाला किती वेळा स्तनपान करावे किंवा किती काळ स्तनपान करावे याबाबत नेमकी माहिती नसते. दरम्यान जन्मानंतर लगेचच बाळाला मातेकडे दिले जाते. जेणेकरुन बाळ आणि आई एकमेकांच्याजवळ येतील. स्तनपानामुळे बाळाचे आणि आईचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. बाळाचा बुध्यांक वाढण्यात मदत होते. डॉक्टर्सच्या सल्लानुसार, किमान सहा महिने मातांनी आपल्या बाळाला नियमित स्तनपान करावे.

 • जन्मानंतर तासाभरात बाळाला स्तनपान करा.
 • बाळाला दिवसाला आणि रात्री किमान ८ ते १२ वेळा स्तनपान करावे.
 • स्तनाची योग्य पकड बाळास योग्य पद्धतीने दूध ओढण्यास मदत करते.
 • स्तनाची योग्य पकड मातेच्या स्तनातून भरपूर दूध तयार करण्यास मदत करते.
 • स्तनांची पकड योग्य असल्यास स्तनातील जाडसरपणा दूर होतो, स्तनाग्रास सूज येण्यासारखा त्रासापासून संरक्षण मिळते.

स्तनपानाची योग्य पद्धत

 • बाळाचे तोंड पूर्णपणे उघडलेले असावे. बाळाची हनुवटी स्तनांना चिकटलेली असल्यास बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान करता येते.
 • स्तनाग्रहाचा गडद भाग बाळाच्या तोंडामुळे झाकलेला असावा. यामुळे बाळाला दूध योग्य पद्धतीने मिळण्यास मदत होते.

  स्तनपानाचे महत्त्व

 •  जन्मानंतर बाळाला मातेचे पहिले पिवळे दूध दिले जावे. या दूधाला चीक दूध असे संबोधले जाते. चीक दूध अनेक आजारांपासून बाळाचे संरक्षण करते.
 • पहिले सहा महिने बाळाला निव्वळ स्तनपान द्यावे. आईच्या दूधाव्यतिरिक्त बाळाला काहीही खायला देऊ नये. पाणी, अन्न किंवा इतर द्रव पदार्थ बाळाला खायला देण्यास डॉक्टर्स सक्त मनाई करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधेही देऊ नये. जर डॉक्टरांनी बाळाला आजारपणावर उपचारांसाठी औषधे दिली असतील तर तीच फक्त द्यावी.
 • सहा महिने पूर्ण होण्याआधी बाळाला इतर अन्न पदार्थ दिल्यास मातेचे दूध कमी होते. बाळ वारंवार आजारी पडण्याचीही भीती असते.

बाळाला भूक लागण्याची लक्षणे

 • बाळाची जीभ बाहेर येणे
 •  बोटे किंवा मूठ चोखणे
 •  तोंड उघडून डोके एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला वळवणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here