तुमचा Call कोणी रेकॉर्ड तर करत नाही ना? कसे ओळखाल

150

गुगलने काही दिवसांपूर्वी थर्ड पार्टी कॉल रेकॉर्ड करणाऱ्या अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. परंतु ज्यांच्या मोबाइलमध्ये इनबिल्ट कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा आहे ते युझर्स रेकॉर्ड करु शकणार आहेत. अनेक लोकांना भविष्यात उपयोगी पडेल या हेतून कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते. तुमचाही कॉल रेकॉर्ड होतोय की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा यामुळे तुम्हाला कॉल रेकॉर्ड होत आहे की नाही हे त्वरित लक्षात येईल.

( हेही वाचा : बेस्टच्या पीएफ निधीमध्ये १९० कोटींचा घोटाळा)

तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय की नाही? 

  • अनेक देशांमध्ये परवानगी न घेता कॉल रेकॉर्ड करणे बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे बहुतांश फोन कॉल रेकॉर्ड करताना एक बीप साउंड देतात. यामुळे तुमचा कॉल कोणीही रेकॉर्ड करत असेल तर एक बीप टोन वाजते. मात्र हे फिचर सगळ्याच फोनवर असते असे नाही.
  • अलिकडे काही अ‍ॅड्रॉईड फोनमध्ये This call is now being recorded असा साउंड मॅन्यूअली सेट केलेला असतो. त्यामुळे तुम्हाला कॉल रेकॉर्ड होतोय की नाही हे लगेच कळेल.
  • काही फोनमध्ये केवळ सिंगल बीप ऐकू येईल त्यामुळे फोनवर बोलताना सतर्क रहा हे कॉल रेकॉर्डिंग सुरू झाल्याचे संकेत आहेत.
  • अनेकदा कॉल स्पीकरवर ठेवून दुसऱ्या फोनमध्ये रेकॉर्ड केले जातात यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज नसते अशावेळी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
  • युझर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊनच गुगल डायलर स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार नाही. ट्रू कॉलरने सुद्धा हे फिचर हटवले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.